महाराष्ट्र राज्यातील सर्व अनु.ठाकूर जमात बंधू आणि भगिनींना आदिम अनु.ठाकूर जमात मंडळ महाराष्ट्र राज्याच्या वतीने चलो अमरावती जाहिर आवाहन ….

२४ जुलै शनिवार रोजी चलो न्याय व हक्कासाठी नागपूर…

जळगाव जिल्ह्यातील ठाकूर जमात बंधू आणि भगिनींना जाहीर आवाहन
करण्यात येते किं मा.आमदार रवि राणा साहेब यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांची तर मा.खासदार सौ.नवनीत राणा मॅडम यांनी मा.महामहिम राष्ट्रपती यांची भेट घेऊन महाराष्ट्र राज्यातील खासकरून अनु.ठाकूर व ३३ जमातीवर महाराष्ट्र शासन व जात पडताळणी समित्या हे काही सत्ताधारी मंडळींच्या दबावाखाली व त्यांच्या सांगण्यावरून 2000 चा जात पडताळणीचा जुलमी अन्यायकारक कायदा करून आजपर्यंत ३३ अन्यायग्रस्त जमातीवर अन्याय ,अत्याचार करीत आली आहे व करत आहे. सदर कायदा हा असविधानिक बेकायदेशिर असून तो त्वरीत रद्द करण्यात यावा.अशा मागणीचे निवेदनही दिले.मा.खासदार नवनीत राणा यांच्या मागणीच्या विनंतीला मान देवुन मा. राष्ट्रपती यांनी लगेचच गृह मंत्रालयाला सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.
हे वृत्त सर्वत्र प्रसिद्ध होताच आपल्या विरोधकांच्या पोटात पोटसुळ उठले व आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार्या मा. राणा दाम्पत्यावर दबाव, निषेध व उपोषण करण्याचा चंग तथाकथीत आदिवासी संघटना व त्यांच्या नेत्यांनी बांधला आहे.व काहीही करून त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न करणार‌‌‌ आहेत.
बांधवांनो मा.आमदारसाहेब व मा.खासदार साहिबा हे शनिवार दिनांक २४ जुलै २०२१ दिल्लीहुन अमरावती येथे येणार आहेत.याच दिवशी विरोधक व मोठमोठे आदिवासी नेते त्यांच्यावर दबावतंत्राचा वापर करण्यासाठी मा.खासदार नवनीत राणा साहिबा ची भेट घेणार आहेत.त्यामुळे आपणही अन्यायग्रस्त म्हणून आपल्या जमातीच्या जास्तीत जास्त बांधवांनी व संघटनांनी २४ जुलै शनिवारी अमरावती येथे उपस्थित राहून खासदार मा.नवनीत राणा साहेब यांची भेट घेवून त्यांना संपुर्ण महाराष्ट्राचे प्रचंड समर्थन असल्याचे दाखवून द्यावे.व विरोधकांना पळती भुई कमी पडावी असे करावे. या वेळी ३३ अन्यायग्रस्त संघटना,अफ्रोह व आदिवासी सघर्षे समिती याही संघटना उपस्थित राहणार आहेत.
आपल्या साठी हे दाम्पत्य लढत आहेत.त्याना समर्थन,पाठींबा देण्यासाठी आपण मिळेल त्या वाहनाने अमरावती येथे पोहचावे. खासदार ११ वाजेपर्यंत सर्वांना भेट देणार आहेत. तरी जास्तीत जास्त संख्येने समाजबांधवांनी उपस्थित रहावे असे आव्हान
श्री यशवंत बागुल – राज्याध्यक्ष,
श्री.पी.एस.आहिरे महासचिव , श्री. हेमंत चंदन ठाकूर राज्य कोषाध्यक्ष,
आदिम अनु.ठाकूर जमात मंडळ. महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!