कोलंबो एकदिवसीय: भारत मालिका जिंकण्याच्या ध्येयाने उतरेल
कोलंबो
19 जूलै
श्रीलंकेला पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभूतकरून तीन सामन्याच्या मािालकेत 1-0 ची आघाडी बनवलेला भारतीय संघ उद्या मंगळवारी येथे होणार्या दुसर्या सामन्यात मालिका जिंकण्याच्या ध्येयाने उतरेल. भारतीय संघ शिखर धवनच्या नेतृत्वात या मालिकेत उतरला आहे. धवन पहिल्यांदा संघाचे नेतृत्व करत आहे आणि त्याने पहिल्या सामन्यात विजयासह सुरूवात केली आहे. धवनने पहिल्या सामन्यात नाबाद 86 धावा बनवल्या आणि संघाला विजय देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.
ऑस्ट्रेलिया दौर्यादरम्यान खराब प्रदर्शनानंतर काही वेळेसाठी संघाने बाहेर राहिलेल्या पृथ्वी शॉ ने चांगल्या पद्धतीने पुनरागामन केले आणि पहिल्या एकदिवसीय सामन्यात 24 चेंडूत 43 धावा बनऊन संघाला मजबुत सुरूवात करून दिली.
याच्या व्यतिरिक्त पहिल्या सामन्याने एकदिवसीय सामन्यात डेब्यू करणारा फलंदाज ईशान किशनने 42 चेंडूत 59 धावांचा स्कोर करून टिम इंडिया विजयाचा पाया ठेवला.
भारतीय तरूण फलंदाजांच्या चांगल्या प्रदर्शनाच्या व्यतिरिक्त स्पिन जोडी कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलने देखील चांगले प्रदर्शन केले. या दोन गोलंदाजांनी दिर्घ कालावधीपासून क्रिकेट खेळले नव्हते आणि याच्या प्रदर्शनावर शंका बनलेली होती.
चाइनामॅन गोलंदाज कुलदीपने 48 धावा आणि चहलने 52 धावा देऊन दोन-दोन गडी बाद केले. श्रीलंका एकावेळी मोठा स्कोर केला आणि वाढत होते आणि त्याने 16 षटकात एक गडी बाद 85 धावा बनवल्या होत्या परंतु कुलदीपने त्याला दोन झटके देऊन सामना भारताकडे वळले.
एक तथ्य हे ही आहे की खेळपट्टी वाळलेली होती ज्याने स्पिनरांना मदत मिळत होती. संघाचा कर्णधार धवनने देखील विजयासाठी स्पिनरांना श्रेय दिले होते.
दुसरीकडे श्रीलंकाई संघ जो जखमी तसेच निलंबनामुळे आपल्या मुख्य खेळांडुशिवाय खेळण्यासाठी उतरला तो प्रदर्शन करण्यात अपयशी राहिला आणि त्याचा प्रयत्न पुनरागमन करण्यावर असेल.