स्वत:च्या पायावर धोंडा! या खेळाडूची विकेट पाहून तुम्हालाही बसेल धक्का
मुंबई
19 जुलै
झिम्बाव्वे विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये दुसरा एकदिवसीय सामना रविवारी खेळवण्यात आला. हा सामनाही बांगलादेशने जिंकत सिरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र सामन्यात लोकांची नजर गेली ती झिम्बाब्वेच्या कर्णधाराच्या चुकीकडे. झिम्बाब्वेचा कर्णधार ब-ेंडन टेलर स्वत:च्याच चुकीमुळे त्याची विकेट गमावून बसला आहे.
दरम्यान झिम्बाब्वे बँटीग करत असताना 25 व्या ओव्हरमध्ये ब-ेंडन टेलर एका विचित्र शॉट मारल्यावर आऊट झाला. यावर अनेकांचा विश्वास ठेवणंही कठीण झालंय. झालं असं की, बांगलादेशाचा वेगवान गोलंदाज शोरिफुल इस्लामच्या बोलिंगवर झिम्बाब्वेचा कर्णधार ब-ेंडन टेलरने अप्पर कट चुकवला आणि चेंडू बाहेर गेल्यानंतर टेलरने या शॉटचा सराव करताना बॅटला मागे केली असता ती थेट जाऊन स्टंपला लागली.यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंच्या अपीलनंतर ऑॅन-फील्ड अंपायर्सने हा निर्णय तिसर्?या पंचांकडे पाठवला. आणि त्यांनी ब-ेंडन टेलरची ही विकेट हिट विकेट म्हणून दिली. ब-ेंडन टेलरच्या आऊट झाल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदा घडलेलं नाहीये. यापूर्वी 1998 मध्ये ऑॅस्ट्रेलियाचा महान फलंदाज मार्क वॉनेही दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी सामन्यात अशाच प्रकारे विकेट गमावली होती.