श्रीलंकेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात शिखर धवनने रचले हे विक्रम
कोलंबो
19 जुलै
टीम इंडियाने श्रीलंकेविरोधातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात सात गडी राखत विजय मिळवला. भारतीय कर्णधार शिखर धवनने या विजयासह अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. या सामन्यात धवनने पहिल्यांदा कर्णधारपद सांभाळले आणि नाबाद 86 धावा करत काही विक्रमही आपल्या नावे केले. माजी कर्णधार सौरव गांगुलीचा एक विक्रम त्याने मोडीत काढला.
धवनने 86 धावांची खेळी करता सहा चौकार आणि एक षटकार लगावला. या बरोबरच धवनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 6000 धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला. धवनने 6000 धावाचा टप्पा गाठताना धवनने वेस्ट इंडिजचे सर विवियन रिचर्ड आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट यांना मागे टाकले आहे. तो 6 हजार धावा करणारा 13 वा भारतीय खेळाडू बनला. या यादीत भारताच्या सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, विरेंद्र सहवाग, गौतम गंभीर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, युवराज सिंह, सुरेश रैना आणि मोहम्मद अझहरुद्दीन या नावांचा समावेश आहे.
140 इनिंग्समध्ये शिखर धवनने 6 हजार धावा केल्या. त्याने सौरव गांगुलीचे रेकॉर्ड मोडीत काढले. गांगुलीने 147 इनिंग्समध्ये 6000 धावा केल्या होत्या. तर विराट कोहलीने 136 इनिंग्समध्ये 6000 धावा केल्या होत्या. विराटनंतर सर्वात वेगवान 6000 धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज शिखर धवन आहे. सर्वात जलद सहा हजार धावा पूर्ण करण्याचे रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाच्या नावावर आहे. आमलाने फक्त 123 सामन्यातच हा विक्रम केला आहे. आमलानंतर दुसर्या क्रमांकावर भारताचा कर्णधाप विराट कोहलीचा (136 सामने) क्रमांक लागतो आणि तिसर्या क्रमांकावर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (139 सामने) आहे.
श्रीलंकेविरुद्ध शिखर धवनने कर्णधारपद सांभाळले. तो सर्वात वयस्कर भारतीय कर्णधार ठरला आहे. धवन वय आता 35 वर्ष 225 दिवस एवढे आहे. याआधी मोहिंदर अमरनाथ 34 वर्ष 37 दिवस वय असताना कर्णधार बनले होते. शिखरने 37 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला आहे.