शेतकरी बांधवांच्या तक्रारीनुसार तत्काळ पंचनामे करून घ्यावे – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे आदेश

विमाधारक शेतकऱयांनी नुकसानाबाबत विमा कंपनीकडे माहिती देण्याचे आवाहन

अमरावती, दि. 19 :  अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झालेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे त्यांच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून संबंधित नुकसानीबाबत तक्रार करावी व त्याचप्रमाणे संबंधित तलाठ्यांनाही माहिती द्यावी. प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारीनुसार तत्काळ शेतीचा पंचनामा करून द्यावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे, शेतकरी बांधवांना माहिती मिळण्यासाठी संपर्क दूरध्वनी क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतीपिकाचे नुकसान झाले असून, शेतकरी बांधवांनी त्याची माहिती विमा कंपनीला तत्काळ द्यावी. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करुन द्यावेत. पीक विमा काढलेल्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळण्यास मदत होईल, याबाबत अधिक माहिती मिळण्यासाठी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

भातकुली तालुक्यातील शेतकरी बांधवांनी हर्षल (गुड्डु) कुचे यांच्याशी 8888321665 या क्रमांकावर, अमरावती तालुक्यातील शेतकरी बांधवांनी विशाल देशमुख यांच्याशी 8788301149 या क्रमांकावर, मोर्शी तालुक्यासाठी  प्रवीण कडू यांच्याशी 9763165984 या क्रमांकावर, तिवसा तालुक्यासाठी संजय चौधरी यांच्याशी 9970668971 या आणि आशिष खाकसे यांच्याशी 9890762810 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत कुठलीही अडचण आल्यास पालकमंत्री कार्यालयाच्या 0721-2666270 किंवा निवासस्थान दुरध्वनी क्रमांक 0721-2665573 वरही संपर्क साधता येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!