आता मोबाइलमध्ये वापरा Windows, Microsoft ने लाँच केली ‘ही’ खास सेवा

नवी दिल्ली प्रतिनिधी

आतापर्यंत इतर कोणत्याही सिस्टममध्ये मायक्रोसॉफ्ट विंडोजला वापरणे शक्य नव्हते. पण, ही समस्या आता दूर होणार आहे. मायक्रोसॉफ्टने Windows 365 लाँच केले आहे. कोणत्याही डिव्हाइसमध्ये याचा वापर करता येईल. विंडोज ३६५ चा वापर डेस्कटॉप, लॅपटॉप आणि मोबाइलमध्ये देखील करता येईल. Windows ३६५ च्या लाँचिंगमागे क्लाउड पीसीची कल्पना सत्यात आणणे आहे. तुम्ही याला कोणत्याही ब्राउजर अथवा वेबद्वारे अ‍ॅक्सेस करू शकता.

मायक्रोसॉफ्टनुसार २ ऑगस्टपासून विंडोज ३६५ ला सर्व फॉर्मेटमध्ये रिलीज केले जाईल. यानंतर मॅक, आयपॅक, लिनक्स आणि अँड्राइड डिव्हाइसमधून याला अ‍ॅक्सेस करू शकता. योबत दोन क्लाउड पीसी कंफिग्रेशन मिळेल, जे विंडोज ३६५ बिझनेस आणि विंडोज ३६५ इंटरप्राइज आहे. याच्या किंमतीत बाबत कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही.

तुम्हाला विंडोज ३६५ सोबत सामान्य विंडोज कॉम्प्यूटर अथवा लॅपटॉपमध्ये, जो अनुभव मिळतो तोच मिळेल. विंडोज ३६५ आणि रेग्यूल विंडोजमध्ये हा फरक असेल की विंडोज तुम्हाला इंस्टॉल करावे लागते. पण विंडोज ३६५ ला तुम्ही वेब ब्राउजरद्वारे वापरू शकता. यात विंडोज १० किंवा विंडोज ११ चे सर्व फीचर्स मिळतील. यात सर्व अ‍ॅप्स, डेटा, टूल आणि सेटिंग मिळेल. थोडक्यात विंडोज ३६५ ही क्लाउड आधारित ऑपरेटिंग सिस्टम आहे. याचा सर्वाधिक फायदा बिझनेस आणि इंटरप्राइजेसला होईल.

मायक्रोसॉफ्टनुसार यामध्ये सर्वप्रकारचे बिझनेस अ‍ॅप्स जसे की, मायक्रोसॉफ्ट ३६५, डायनॅमिक ३६५ आणि पॉवर प्लॅटफॉर्मचा सपोर्ट मिळेल. मायक्रोसॉफ्ट अ‍ॅडव्हांस मॅनेजरदेखील यात काम करेल. सोबतच, अ‍ॅडप्वाइंड अ‍ॅनालिटिक डॅशबोर्डचा देखील सपोर्ट मिळेल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!