भारतीय वंशाच्या जस्टिन नारायण यांनी जिंकला ’मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया 2021’
कॅनबरा प्रतिनिधी
14 जुलै
मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वात यशस्वी कुकिंगची स्पर्धा आहे. ही स्पर्धा गेल्या 13 वर्षांपासून सुरू आहे. यंदाच्या सीझनचे विजेते भारतीय वंशाचा स्पर्धक जस्टिन नारायण हे ठरले आहेत. जस्टीन नारायण हे भारतीय वंशाचे आहेत. यापूर्वी 2018 मध्ये साशी चेलिहा या भारतीय वंशाच्या स्पर्धकानेही हा शो जिंकला होता.
मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया 2021 जिंकल्यामुळे बक्षीस म्हणून त्यांना 2.5 लाख डॉलर मिळाले आहेत. जस्टिन नारायण हे पश्चिम ऑस्ट्रेलियात राहतात. ते फक्त 27 वर्षाचे आहेत.
जस्टिन यांनी वयाच्या 13व्या वर्षी स्वयंपाक करण्यास सुरवात केली. कुकिंगची प्रेरणा आईपासून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. स्वत:च रेस्टॉरंट सुरू करायचे जस्टिन यांचे स्वप्न आहेत. आपल्या रेस्टॉरंटमध्ये ते भारतीय व्यंजने ठेवणार आहेत.