राष्ट्रीय कवी संगमची जिल्हा कार्यकारिणी जाहीर…
जळगाव …राष्ट्रीय कवी संगम या राष्ट्रीय पातळीवर साहित्य क्षेत्रात कार्य करणा-या संस्थेची राज्यस्तरीय बैठक नुकतीच संपन्न झाली. यात जळगाव,नाशिक व ठाणे या जिल्ह्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. आगामी कार्यक्रमाबाबत राष्ट्रीय पदाधिका-यांनी माहिती दिली.
बैठकीच्या सुरूवातीस मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. राज्य सोशल मिडीया प्रमुख राजेश यादव यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – जिल्हाध्यक्ष –
दिनेश वसंतराव नाईक (अमळनेर), जिल्हा महामंत्री – रविंद्र तुकाराम पाटील (पाचोरा), जिल्हा संघटन महामंत्री –
आशीष प्रकाश दुसाने (अमळनेर), जिल्हा सोशल मिडीया प्रमुख – गौरव पद्माकर नाथ (चोपडा), जिल्हा कोषाप्रमुख – श्री राकेश रमेश शर्मा (अमळनेर), कार्यकारिणी सदस्य -सौ.रश्मीताई पाटील
(चाळीसगांव), अमळनेर तालुका संयोजक – मधुर नंदकुमार पाटील, पाचोरा तालुका संयोजक -हर्षल प्रविण पाटील.
या नवनिर्वाचित राष्ट्रीय कवी कार्यकारिणीचे चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री जगदीश मित्तल,राष्ट्रीय महामंत्री अशोक बत्रा,महाराष्ट्र राज्य प्रभारी योगेंद्र शर्मा,प्रदेश संरक्षक बृजमोहन मुंदडा,प्रदेशाध्यक्ष महेश दुबे, कोषाध्यक्ष संजय बंसल, प्रदेश मीडिया प्रमुख राजेश यादव यांनी अभिनंदन केले आहे.