भारत 2026मधील बीडब्ल्यूएफ विश्व चॅम्पियनशिपची यजमानी करणार
नवी दिल्ली प्रतिनिधी
13जुलै
बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (बीडब्ल्यूएफ) ने भारताला 2026 मध्ये होणार्या प्रतिष्ठित बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपची यजमानी दिली असून मंगळवारी याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
भारत 2026मध्ये बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपची यजमानी करणार असून भारत दुसर्यांदा या स्पर्धेची यजमानी करणार आहे. ही स्पर्धा ऑलम्पिक वर्षाला वगळता प्रत्येक वर्षी आयोजीत केली जाते आहे. भारताने हैद्राबादमध्ये 2009 मध्ये या आधी बीडब्ल्यूएफ विश्व चॅम्पियनशिपची यजमानी केली होती.
भारताने या व्यतिरीक्त 2014 मध्ये थॉमस आणि उबर कप अंतिम सामना, आशिया चॅम्पियनशिप व्यतिरीक्त वार्षिक बीडब्ल्यूएफ सुपर 500 इव्हेंट, योनेक्स -सनराइज इंडिया ओपनसह विविध प्रमुख बॅडमिंटन स्पर्धांची यजमानी केली आहे.
भारतीय बॅडमिंटन संघाचे अध्यक्ष हिमंत बिस्वा शर्माना विश्वास आहे की 2026 मध्ये विश्व चॅम्पियनशिपच्या यजमानीमुंळे भारतीय बॅडमिंटनला विश्व महाशक्ती बनण्याच्या दिशेत मोठे पाऊल उचण्यास मदत मिळेल. अशा प्रतिष्ठत स्पर्धाची यजमानी बॅडमिंटन आणि भारतीय बॅडमिंटन संघा बरोबरच देशासाठीही एक मोठे यश असेल.
नुकतेच 2021-24 च्या कालावधीसाठी बीडब्ल्यूएफ परिषदेतील सदस्याच्या रुपात निवड झालेले शर्मानी म्हटले की आम्ही बॅडमिंटनच्या सर्वात प्रतिष्ठित आणि प्रमुख स्पर्धेची यजमानी भारताला देण्यासाठी बीडब्ल्यूएफचे आभारी आहोत. माझ्या मते या चॅम्पियनशिपच्या माध्यमातून भारतामध्ये विश्वस्तरीय खेळाडूंच्या भाग घेण्याने खेळाच्या प्रति उत्साही लोकांसाठी एक महान संधी निर्माण होणार असून यामुळे देशात या खेळाच्या विकासामध्येही एक नवीन दिशा मिळेल.
कोराना विषाणू महामारीने 2020 मध्ये क्रीडा हालचालींना पूर्णपणे रोखले गेले होते. याने बीडब्ल्यूएफलाही आपल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा कॅलेंडरांनाही बदलण्यासाठी मजबूर केले होते. खेळाची शासन शाखेला 2021 सुदीरमन कपला सूजौ, चीनहून फिनलँडमध्ये स्थानांतरीत करण्यासाठी बाध्य केले होते. अशाच प्रकारे 2023 सुदीरमन कपला मूळपणे भारताला आयोजीत करण्यासाठी दिले होते आता सूजौला चीनमध्ये आयोजीत केले जाईल.
भारतीय बॅडमिंटन संघ (बीएआय) चे महासचिव अजय के.सिंघानियानी म्हटले की स्पर्धा सतत रद्द होणे आणि महामारीच्या कारणामुळे यासाठी जागतीकस्तरावर व्यासपीठ उपलब्ध न होण्याच्या कारणामुळे बीडब्ल्यूएफ एक पर्यायी प्रस्तावासह आमच्याकडे पोहचला होता. बीएआयमध्ये आम्हांला जाणिव केली की हे देशा बरोबरच बॅडमिंटन क्षेत्रासाठी एक महान संधी आहे.