पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आज कोणतीही वाढ नाही

नवी दिल्ली प्रतिनिधी

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ नाही

13 जुलै

देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी ऐतिहासिक उंची गाठली आहे. तेल कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. आज पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ झालेली नसून पेट्रोल आणि डिझेल दोन्हींचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. मुंबईमध्ये यापूर्वीच पेट्रोलनं शंभरी गाठली होती, आता दिल्लीतही पेट्रोल शंभरी पार पोहोचलं आहे. मुंबईत पेट्रोल 107.20 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. दिल्लीत सध्या पेट्रोल 101.19 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. तर डिझेलची किंमत 89.72 रुपये प्रति लिटर इतकी आहे.

जाणून घ्या प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलच्या किमती :

दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत रुपये प्रति लीटरमध्ये खालीलप्रमाणे…

शहरं पेट्रोची किंमत प्रति लिटर डिझेलची किंमत प्रति लिटर

दिल्ली 101.19 89.72

मुंबई 107.20 97.29

चेन्नई 101.92 94.24

कोलकाता 101.35 92.81

बंगळुरू 104.58 95.09

भोपाळ 109.53 98.50

चंदीगढ 97.37 89.35

लखनौ 98.29 90.11

पाटना 103.92 95.30

सोमवारी काय होते दर?

देशात पेट्रोलच्या किंमतीत सोमवारी वाढ झाली होती. सोमवारी पेट्रोल 28 पैशांनी महाग झालं असून मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 107.20 रुपयांवर गेली होती. तर डिझेलची किंमत 17 पैशांनी घटून ती 97.29 रुपयांवर पोहोचली होती. दिल्लीमध्ये काल पेट्रोलची किंमत 101.23 रुपयांवर गेली होती तर डिझेलच्या दरात 16 पैशांनी घट झाली असून त्याची किंमत 89.76 रुपये इतकी झाली होती.

देशातील सर्व महानगरातील पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध- प्रदेश, तेलंगाना, तमिलनाडू, कर्नाटक, जम्मू आणि कश्मीर, ओडिशा, केरळ, बिहार, पंजाब, लड्डाख, सिक्किम आणि दिल्ली या ठिकाणी पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या वरती गेले आहेत.

देशात 15 जून 2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!