पॅरा निशानेबाज चार पदक जिंकण्यात सक्षम
नवी दिल्ली प्रतिनिधी
12जुलै
जपानमध्ये होणार्या पॅरा ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय निशानेबाज संघ कमीत कमी चार पदक जिंकण्यात सक्षम आहेत असे मत मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक जे.पी.नौटियाल यांनी व्यक्त केले. नौटियाल यांनी येथील डॉ.कर्णी सिंह शूटिंग रेंजमध्ये अंतिम तयारीचा आढावा घेतला.
मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक नौटियाल यांनी सोमवारी म्हटले की युवा आणि वरिष्ठ खेळाडू बरोबर एक संतुलित टिम आहे आणि यातील अनेक जण प्रशिक्षणात उत्कृष्ट स्कोरसह आले आहेत. हा पूर्ण संघासाठी एक शानदार प्रवास राहिला असून यांच्यापैकी अनेकांकडे अंतिममध्ये चांगले परिणाम मिळविण्यासाठी चांगले टेम्परामेंटही आहे.
पॅरालॅम्पिक कमेटी ऑफ इंडियाच्या शूटिंग टेक्निकल कमेटी (एसटीसी) चे अध्यक्षांनी सांगितले की प्रत्येक जण खूप मेहनत करत आहे आणि लक्ष केंद्रित करत आहेत. मला विश्वास आहे की ते चांगले परिणाम देतील व सुवर्णसह कमीत कमी चार पदकांची मला आशा आहे.
शीर्ष पिस्टल निशानेबाज सिंहराज आणि मनीष नरवालसह रेकॉर्ड 10 पॅरा निशानेबाजाना खेळासाठी नामित करण्यात आले आहे. पहिल्यांदाच दहा पॅरा निशानेबाजांनी योग्यतेसाठी आवश्यक बेंचमार्क मिळविला आहे. रियो 2016 पॅलम्पिंकमध्ये फक्त एक निशानेबाज नरेश शर्माने रायफल स्पर्धेत क्वालीफाइंग बर्थ मिळविला होता.
निशानेबाजी संघ : पुरुष – मनिष नरवाल (पी-1,पी-4), सिंहराज (पी-1, पी-4), दीपेंद्र सिंह (पी-1), दीपक (आर-1, आर-6, आर-7), सिध्दार्थ बाबू (आर-3,आर-6), स्वरुप महावीर उन्हाळकर (आर-1), आकाश (पी-3,पी-4), राहुल जाखड (पी-3)
महिला – अवनी लेखारा (आर-2, आर-3,आर-6, आर-8), रुबीना फ्रॉसिस (पी-2)