आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमध्ये व्यापार वित्त सेवा पुरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार वित्त सेवा मंच उभारण्यासाठी आणि कार्यान्वित करण्यासाठी संरचना

नवी दिल्ली, 12 जुलै 2021

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमध्ये वित्तीय उत्पादने,वित्तीय सेवा आणि वित्तीय संस्था विकसित करण्यासाठी आणि नियमन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रे उभारण्यासाठी आवश्यक ती संरचना निर्माण करण्यात आली आहे

आयएफएससीए कायदा 2019 अंतर्गत याची निर्मिती करण्यात आली. या दिशेने आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमध्ये व्यापार वित्त सेवा पुरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार वित्त सेवा मंच उभारण्याकरिता आणि कार्यान्वित करण्यासाठी आयएफएससीएने  संरचना निर्माण केली आहे.

यामुळे  आयातदार आणि निर्यातदारांना आयटीएफएस सारख्या समर्पित इलेक्ट्रोनिक मंचाद्वारे त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवहारासाठी स्पर्धात्मक शर्तीवर विविध प्रकारच्या व्यापार वित्त सुविधांचा लाभ घेणे शक्य होणार आहे. यामुळे व्यापार मिळकतीचे रोकड सुलभतेत रुपांतर  करण्याची आणि अल्प काळासाठी वित्त पुरवठा प्राप्त करण्यासाठी व्यापाऱ्यांची क्षमता सुधारणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!