वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आज पासून बालकांना मिळणार ‘न्यूमोकोकल’ लस…
राष्ट्रीय लसीकरण अभियानात न्युमोकोकल म्हणजेच पीसीव्ही लसीचा समावेश करण्यात आला असून आज पासून भुसावळ तालुक्यातील वरणगाव ग्रामीण रुग्णालयात न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन मोफत मिळणार आहे.
मनुष्यप्राण्याला जेव्हा शारीरिक व्याधी आजार निर्माण होतात तेव्हा सर्वप्रथम रुग्णाच्या मुखावाटे एकच वाक्य वाट काढतो ते म्हणजे रुग्णालया
शिवाय मनुष्याचे जगणेही अवघडच ?
१ वर्षाच्या वयाच्या आतील बालकांना या लसीचे ३ डोस द्यावे लागतात जर १ पूर्ण व्हायला काही दिवस कमी असताना सुद्धा पहिला डोस दिला गेला असल्यास पुढील राहिलेले दोन डोस ही एक वर्षे पूर्ण झाल्यावर ही देऊ शकतात
वरणगाव ग्रामीण रुग्णालयात कोरोना काळात गेल्या दोन वर्षांपासून दवाखान्यातील संपूर्ण स्टाफ हा कायम वरणगाव व परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र झटलेला आहे
मग ते कोरोना पेशंट असो किंवा लसीकरण व इतर आजारी रुग्णाला ही आम्ही योग्य ती सेवा पुरवलेली आहे
कोरोना संसर्ग आजाराचे संकट हे दवाखान्यातील स्टाफ च्या परिवारातील सदस्य यांना ही काही प्रमाणात लक्षणे ही दिसत असतांना आम्ही रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा समजून आम्ही कर्तव्यामध्ये किंचित तही खंड पडू दिलेला नाही नित्यनेमाने वरणगाव वासींयाना व परिसरातील गावखेडयातील नागरिकांना सेवा ही बजावलेली आहे
असे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर क्षितिजा हेडवे यांनी
आपले मत व्यक्त केले
व कोरोना संसर्ग वातावरणात ही
दवाखान्यातील अस्थायी कर्मचारी हे कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे खांद्याला खांदा लावून स्वतःचा जीव संकटात टाकून तुटपुंज्या वेतनावर सेवा हे देत राहिले
या संदर्भात
अशा अस्थाई कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर कायमस्वरूपी करावे अशी मागणी अस्थाई कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
तसेच संकटकाळात वरणगाव ग्रामीण रुग्णालयात योग्य ते उपचार लसीकरण सेवा मिळाल्यामुळे वरणगावातील सुज्ञ नागरिकांकडून संपूर्ण स्टॉप चे आभार व्यक्त केले जात आहे.
या लसीकरणाचे उद्घाटनप्रसंगी माजी नगरसेविका मालतीताई मेढे यांच्या हस्ते करण्यात आले आज या लसीकरणाच्या दोन वाईल्स ग्रामीण रूग्णालयांमध्ये उपलब्ध झाले आहेत ही लस लहान मुलांसाठी मोफत उपलब्ध झाली आहे या लसीमुळे लहान मुलांना निमोनिया हा आजार होणार नाही या उद्घाटन प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर क्षितीजा हेंडवे डॉ अविनाश सुरवाडे कामगार नेते मिलिंद मेढे अधिपरिचारिका सुनीता केदारे अर्चना वासनिक पल्लवी सुरवाडे शितल बोदडे प्रीती आराख मोहिनी सपकाळे प्रयोगशाळा तंत्रज्ञ भोजराज लोखंडे सहाय्यक दिलीप गायकवाड वरिष्ठ लेखापाल महेंद्र सोनवणे कनिष्ठ लेखापाल आकाश इंगळे एक्स-रे टेक्निशियन उदय बोंडे व आय सी टी सी कर्मचारी आणि आर बी एस के ,आर के एस के कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आय सी टी सी च्या समुपदेशक ज्योती गुरव यांनी केले.
जेव्हा शारीरिक व्याधी आजार निर्माण होतात तेव्हा सर्वप्रथम रुग्णाच्या मुखावाटे एकच वाक्य वाट काढतो ते म्हणजे रुग्णालया
शिवाय मनुष्याचे जगणेही अवघडच ?
✍🏻दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण आपल्या परिसरातील बातमी 95940 47437 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपण आपल्या नावाने बातमी दिल्यास आमच्या दैनिक मध्ये प्रसिद्धी केली जाईल.
आपला विश्वासू
प्रशांत पाटील
भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
95940 47437