मैत्रेय असोसिएशनची मिटिंग संपन्न…..

दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव प्रतिनिधी शैलेंद्र ठाकूर..

दिनांक 11/07/2021 रविवारी रोजी सकाळी 11 वाजता ,अयोध्या नगर, जळगाव येथे मैत्रेय असोसिएशनची मिटिंग घेण्यात आली.

मैत्रेय असोसिएशनचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर पाटील व उपाध्यक्ष श्री. प्रदिप सिसोदे यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग आयोजित करण्यात आली . मैत्रेय मंध्ये फसवणूक झालेल्या ग्राहकांच्या प्रकरणात माननीय, आमदार श्री. किशोर आप्पासाहेब पाटील यांनी मैत्रेय फसवणूक प्रकरणात मंत्रालय येथे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. म्हणून त्यांचा मैत्रेय असोसिएशन तर्फे सत्कार करण्यात यावा व मैत्रेय कंपनी च्या CMD श्रीमती वर्षा सत्पाळकर यांचा नाशिक येथील कोर्टातील जामीन रद्द करण्यात यावा या साठी असोसिएशन तर्फे याचिका नाशिक कोर्टात दाखल करण्यात येणार आहे..

मैत्रेय प्रॉपर्टी लवकरात लवकर विक्री करून ग्राहकांचे पैसे परत मिळावे म्हणून मुंबई कोर्टात असोसिएशन तर्फे पाठपुरावा करण्यात येणार आहे. सर्व विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मैत्रेय असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्याच बरोबर असोसिएशनचे सचिव श्री.निलेश वाणी, सहसचिव श्री. गौतम महाजन, खजिनदार श्री. मंगल परदेशी, सदस्य श्री. अशोक चोधरी श्री. पांडुरंग बंडगर, श्री. बाबुराव घुले, श्री.सुभाष पाटील,श्री.सुरेश सपकाळे, श्री. सुभाष सोनगीर, श्री.पिंटू दर्डा, श्री. चतुर देसले,श्री. डी. यु. पाटील यांची मिटिंग ला उपस्थिती लाभली. सदर माहिती मैत्रेय असोसिएशन चे राष्ट्रीय सचिव श्री. निलेश वाणी यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!