केळी पिकावर आलेल्या आज्ञात रोगाने शेतकरी चिंताग्रस्त
खिर्डी (प्रतिनिधी):-दि 5
रावेर तालुका हा जिल्हाभरात केळी उत्पादनचा तालुका म्हणुन ओळखला जातो.
दर्जेदार केळीचे उत्पादन घेण्यासाठी
शेतकऱ्याची चढाओढ नेहमीच सुरू असते.
यामुळे शेतकरी व शेतमजुर यांना पुर्ण
वर्षभर शेतीच्या वेगवेगळ्या कामाची मशागत करावी लागते . मजुरांच्या हाताला काम , व शेतक यांना ऊत्पादन अशी दुहेरी कसरथ नेहमी या तालुक्यात बघायला मिळते .
परंतु गेल्या काही वर्षापासुन या पिकावर वेगवेगळे आसमानी , सुलतांनी , संकट पाहायला मिळालेले आहेत .
त्यात प्रामुख्याने वादळ , गारांचा तडाखा ., पुरांचा फटका , करपा, चरका , खोड किडा, गेल्या वर्षी लहान केळी बागांवर आलेला सी एम व्ही , असे अनेक संकटे ऊभी टाकलेली असतांनाच आता या नविन आज्ञात रोगाची सुरुवात होतांना दिसत आहेत .
या तालुक्यातील पुरी गोलवाडे येथिल शेतकरी योगेश तायडे या अल्पभुधारक शेतकऱ्याने एक हजार आठशे केळीचे कंद
त्याच्या एक एकर शेतामध्ये ,
दुसऱ्या शेतकऱ्यांकडुन
घेऊन [बिजवाई ] जुन , दोन हाजारला लागवड केली होती .
आजरोजी ती केळी बाग निसुन , परिपक्व होत असता , केळावर केळ ,
असा विचित्र प्रकार पाहावयास मिळत आहे .
त्यामुळे या शेतकऱ्याची बाग पाहा०यासाठी , बघ्याची गर्दी उसळली आहे .
हा कुठला प्रकार आहे .
असे आम्ही कधी पाहीले नाही
असे लहानांपासुन ते वयोवृध्द शेतकरी सांगत आहेत
तर हा प्रकार नेमका काय आहे
हे शोधण्याची गरज असल्याचे जाणकार शेतकऱ्यांमधे बोलले जात आहे .
केळावर केळ ,असल्याने व्यापारी
या बागेतील केळी खरेदी करायला नाराजी दर्शवतात .
किंवा कमी भावाने मागणी करतात .
माहागडे कंद घेऊन बागेची लागड करून , तसेच वरचढ भावाने रासायनिक खते , वाढलेले मजुरी दर ,
फवारणी , करून उभे केलेल्या पिकाला अशी केळावर केळ , होत राहीले तर, अतोनात नुकसान होण्याची भिती निर्माण झाली आहे.
पुरी गोलवाडे शिवारात
एका शेतकऱ्याच्या शेतात ७ते ८ केळीची झाडे रोग ग्रस्त झालेली असुन , त्यापैकी सहा झाडे आधीच कापुन फेकलेली आहेत .
आज दोन झाडे ऊभी असुन,
आजुन झाडे वाढ०याची शक्यता शेतकरी सांगत आहे .
तसेच पुर्ण गाव शिवाराला याची लागण झाली तर , केळी उत्पादकांना
मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका
बसण्याची शक्यता नाकारता येत नाही .
तरी हा नेमका काय प्रकार आहे
हे शोधुन ,
केळी उत्पादना मार्गदर्शन व्हावे अशी मागणी सुज्ञ शेतकरी करीत आहेत