आशा सेविंकां कडून मोर्चात आरोग्य सेविकां बद्दल केलेल्या अपशब्दांचा निषेध करीत -जळगाव जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी (DHO) श्री डाॅ.बि.टी.जमादार यांना आरोग्यसेविकां नर्सेस संघटने कडुन निवेदन सादर…
दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ प्रतिनिधी राजेंद्र ठाकूर
नांदेड येथील मालेगाव येथे पार पडलेल्या आशा वर्कर त्यांच्या मोर्चात आरोग्य सेविकांबद्दल अपमानास्पद अपशब्दांचा वापर करण्यात आला व त्याचे व्हिडिओ देखील वायरल झालेत या गोष्टीचा सक्त निषेध म्हणून महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या संघटक मनीषा एम ठाकूर, राजश्री वाघोदे, वैशाली दाणी, अरुणा खरात, वैशाली तळेले, सुनंदा नगरे , अनिता राजपूत, प्रतिभा घुगे प्रतिभा घुगे, वंदना बडगुजर यांनी जळगाव जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी (DHO) श्री डाॅ.बि.टी.जमादार यांना निवेदन दिले
यासंदर्भात संघटनेच्या महिला संघटक मनिषा एम ठाकूर (ANM प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तळवेल ) यांनी आशा वर्कर सेविकांचे हे कृत्य अत्यंत निंदनीय आहे व त्यांनी जाहीर माफी मागावी असे सांगितले.
दि.२३ जून रोजी मालेगाव (नांदेड) येथे आशा वर्कर सेविकांचे संपामध्ये केलेल्या भाषणामध्ये आरोग्यसेविकेच्या विषयी अपमानास्पद बोलण्यास आले होते , आशा व गटप्रवर्तक संघटनेने पुकारलेला संप नेमका त्यांच्या मागण्यासाठी होता का महिलांना महिलांच्या विरोधी भडकवण्यासाठी होता ?
आपल्या हक्कासाठी संप पुकारने योग्य आहे . तुटपुंज्या पगारात काम करत असलेल्या आशाभगिनींना नेहमीच नर्सेसचा पाठिंबा असतो. फक्त संप करताना एकमेकांच्या भावनांचा विचार करावा तुमच्या मागण्यासाठी एएनएमला पुन्हा लक्ष करु नका.
संप करुन तुम्हाला जे काही शासनस्तरावर मागायचे ते मागा तुम्हाला आमचा नेहमीच पाठिंबा राहिल परंतु एकमेकावर आरोप प्रत्यारोप थांबवा एकत्र काम करा एकमेकांवर चिखलफेक नकोआणि एएनएमनी काय काम करायचे हे शासन ठरविल तेव्हा पुन्हा शब्दांचा वापर सांभाळून करा , पुन्हा असले बिनबुडाचे आरोप जिल्हा परिषद नर्सेस संघटना खपवून घेणार नाही .
आरोग्य सेविकांनी या महामारीच्या काळामध्ये रात्र दिवस काम केलेले आहे अशा परिस्थितीत आशा वर्कर्स त्यांना अपमानीत करुन मानसिक खर्चीकरन करत आहेत . तरी त्यांनी जाहीर व लेखी स्वरुपात माफी मागावी व यापुढे भविष्यात असे अपशब्द बोलू नये . अन्यथा संपूर्ण जिल्हाभरात नर्सेस संघटना काम बंद आंदोलन करेल.
असे निवेदनात म्हटले आहे.