राष्ट्रीय जनक्रांती पार्टी प्रदेश अध्यक्ष हिम्मतराव कोरडे यांनी जळगाव जिल्हाध्यक्षपदी नितीन नाईक तर युवा जिल्हाध्यक्ष म्हणून प्रियंकासिंग नाईक यांची निवड केली..
दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव प्रतिनिधी
दिनांक 29 रोजी जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात जामनेर शहरात राष्ट्रीय जनक्रांती पार्टीच्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले . त्याच प्रमाणे पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री . हिंमतराव कोरडे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली . तसेच जिल्हाध्यक्षपदी युवा तरुण तडफदार नेतृत्व श्री नितीन नाईक तर युवा जिल्हाध्यक्ष म्हणुन प्रियंका सिंग (नाईक ) यांची एकमताने निवड करण्यात आली . श्री हिंमतराव कोरडे यांनी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचा नियुक्ती पत्र ,गुलाबपुष्प देऊन सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी जबाबदारी सोपविण्यात आली,
यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष नितीन नाईक यांनी पक्षाच्या ध्येय धोरणानुसार सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत करील असे सांगितले,
युवा जिल्हाध्यक्ष प्रियंका सिंग नाईक यांनीही पक्षवाढीसाठी व जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहण्याचे आश्वासन दिले,
राष्ट्रीय जनक्रांती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री . हिंमतराव कोरडे यांनी आपले मनोगत मध्ये सांगितले की राजमाता जिजाऊ व शहाजी राजे यांच्या संकल्पनेतील रयतेचे राज्य व्हावे , छत्रपति शिवाजी महाराजांनी शेतकरी ,आदिवासी, अठरापगड जाती समूहातील मावळ्यांनी यासाठी आपले योगदान दिले, ,लोककल्याणकारी विचारधारा व प्रेरणा या त्यांच्या पाठीमागे होती आजच्या लोकशाही शासन व्यवस्थेचा पाया शिवराय फुले-शाहू-आंबेडकर ही विचारधारा संविधानात अंतरभूत झाली,
सामाजिक सांस्कृतिक राजकीय गुलामगिरी संपवण्यासाठी महामानवाचे विचार मस्तकात घेऊन संघर्ष करावा लागेल.
देशासह जिल्ह्यात वाढती बेरोजगारी, महिलांचे सशक्तीकरण, सर्वच क्षेत्रात समान संधी सह व्यवस्था व कायदे करून त्याची अंमलबजावनी करणे . कर्ज बुडव्या उदयोगपतींना मदत करणाऱ्याला देश द्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करून त्यांची संपत्ती जप्त करणे, आदीवासी बांधवांचे वनवासीकरण थांबवुन त्यांना मुलभुत सुविधा पुरविणे, दारु गुटखा , सिगारेट, अमली पदार्थ इ . वर बंदी घालणे, गरज नसलेल्या मेट्रो, बुलेट ट्रेन समृध्दी महामार्ग प्रकल्प रद्द करणे, छत्रपती शिवराय, डॉ . बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले, शाहु महाराज, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, इ. महामानवांची स्मारके उभारुन त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा . सर्व धार्मिक स्थळांचे राष्ट्रीय करून त्यांच्या उत्पन्नातुन शेती, शिक्षण, आरोग्य , रोजगार, निर्मितीवर तो खर्च व्हावा .
संपुर्ण देशात एकाच दर्जाचा गुणवत्ता पुर्ण अभ्यासक्रम लागु करावा . आद्ययावत सरकारी दवाखाने देशभर निर्माण करून ,मोफत आरोग्य सेवा पुरविणे, कंत्राटी नोकरभरती बंद करणे, ग्रामीण भागात उदयोग उभे करून स्थानिकांना रोजगार दयावा, शिक्षण क्षेत्रात शुद्ध शिक्षकांना नवीन DCPS योजना(2005)बंद करून, एकच जुनी पेन्शन योजना लागू करावी. नवीन अंशदान पेन्शन हा अन्याय असून ,मानवी समानतेच्या विरोधात आहे .समान काम समान वेतन प्रमाणे समान पेन्शन सुध्दा हवी, स्वयंरोजगारासाठी तरुणांना विनातारण कर्ज पुरवठा करणे अशा असंख्य मागण्यांचा पाठपुरावा राष्ट्रीय जनक्रांती पार्टी करण्यासाठी सदैव तत्पर कटीबध्द राहणार असल्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्ष श्री. हिंमतराव कोरडे यांनी दिले .
राष्ट्रीय जन क्रांति पार्टी हा लढा लढत आहे आणि सर्वांसाठी लढत राहील आज बरेच शेतकरी आत्महत्या करीत आहेत महिला सुरक्षित नाही युवकांना रोजगार नाही नोटबंदी, जीएसटी ,सरकार पुरस्कृत उन्माद, सरकारी अनुदानित शाळा बंद करणे या माध्यमातून दहशत निर्माण केली जात आहे, भावनिक प्रश्न आणून हक्क-अधिकार नाकारण्याचे हे षड्यंत्र आहे ,
मागण्यांचा पाठपुरावा राष्ट्रीय जनक्रांती पार्टी करण्यासाठी सदैव तत्पर कटीबध्द राहणार असल्याचे आश्वासन दिले,
स्वातंत्र्यानंतर राजकीय पक्षांनी आलटून पालटून सत्ता भोगली आणि जनतेला कंगाल केले आहे,
या पार्श्वभूमीवर लोक प्रबोधन करून सत्ता परिवर्तन घडवू ,
राष्ट्रीय जनक्रांती पार्टी 2014 पासून 21 राज्यात कार्यरत आहे संविधान बळकटीसाठी राष्ट्रीय जनक्रांती पार्टी पार्टीच्या काही मागण्या आहेत – शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी द्यावी, पूर्णवेळ वीज पाणी व शेतीसाठी बियाणे मोफत मिळावे, शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर दरमहा दहा हजार रुपये पेन्शन मिळावी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित व शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा, विकास कामासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्याला भागीदार करावे व सातबारा शेतकऱ्यांच्या नावाने रहावा,अशी मागणी राष्ट्रीय जंनक्रांती पार्टी प्रदेश अध्यक्ष हिम्मतराव कोरडे यांनी जामनेर जिल्हा जळगांव येथे प्रेस कॉन्फरन्स मध्ये केली.