धुळे शहरामधील महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत रस्त्यांची प्रलंबित कामे पंधरा दिवसात पूर्ण करा

सार्वजनिक बाधंकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

मुंबई, दि. 29 : धुळे शहरामधील महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत प्रलंबित रस्त्यांची कामे तात्काळ पूर्ण करावीत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

यासंदर्भात राज्यमंत्री श्री.भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला धुळे महानगरपालिका आयुक्त अजीज शेख, शहर अभियंता कैलास शिंदे, धुळे सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता वर्षा महेश घुंगरी, उपविभागीय अभियंता ए. एम. शाह, धुळे येथील रणजित भोसले आदी उपस्थित होते.

धुळे शहरामधील महाराष्ट्र राज्य सुवर्ण योजनेअंतर्गत प्रलंबित रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली होती. त्याची तातडीने दखल घेऊन श्री. भरणे यांनी ही बैठक घेऊन कार्यवाहीचे निर्देश दिले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!