एसबीसी प्रवर्गाने sbc कुटुंब ॲपमध्ये सहभागी व्हावे — शशिकांत आमने
प्रतिनिधी
सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण देशामध्ये गाजत आहे. ओबीसीचे आरक्षण धोक्यात आणले जात आहे.या पार्श्वभूमीवर भविष्यामध्ये असाच प्रसंग obc तीलच एस.बी.सी.प्रवर्गावर येऊ शकतो. त्यासाठी एसबीसी प्रवर्ग एकत्रित येण्याच्या दृष्टिकोनातून sbc कुटुंब ॲपमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संघर्ष समितीचे अध्यक्ष शशिकांत आमणे यांनी केले आहे.
देशातील ओबीसी या प्रवर्ग अंतर्गत विविध जातींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात ओबीसी जनगणना झालेली आहे.त्यानंतर वारंवार मागणी करूनही ओबीसी जातनिहाय जनगणना तयार असूनही जाहीर करण्यास सरकार तयार होत नाही. त्यामुळे केवळ राजकीय स्वार्थापोटी ओबीसींचे sbc चेआरक्षण जाणीवपूर्वक धोक्यात आणले जात आहे,ही बाब विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) साठी सुद्धा घातक आहे . यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असणाऱ्या एसबीसी प्रवर्गातील समाजबांधवांनी एकत्रित येऊन फार मोठी चळवळ उभा करण्याची गरज निर्माण झाली आहे.सध्या कोरोनाचा वाढता प्रसार व कडक संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये दौरे काढता येत नाहीत.त्यामुळे एसबीसी समाजाशी संपर्क करण्यास सध्या अडथळा निर्माण झालेला आहे.या पार्श्वभूमीवर एसबीसीच्या समाज बांधवांनी एकत्रित येण्यासाठी sbc कुटुंब ऍप तयार करण्यात आले आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज एकत्रित करून एसबीसीचे असणाऱ्या अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली जाणार आहे.महाराष्ट्रातील युवक-युवतींनी या ॲपमध्ये आपला सहभाग नोंदवून सध्याच्या अडचणी व भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणी विषयी सूचना द्याव्यात.तसेच शासकीय व न्यायालयीन लढाईसाठी एसबीसी प्रवर्गने या कुटुंब ॲपमध्ये आपला सहभाग नोंदवून भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन शशिकांत आमणे यांनी केले आहे.