रुग्ण सेवेसाठी तत्परता देवा ग्रुप फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम…

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ ग्रामीण प्रतिनिधी प्रशांत पाटील

लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून देवा ग्रुप फाउंडेशनवर होत आहे कौतुंकाचा वर्षाव…

भुसावळ तालुक्यातील देवा ग्रुप फाउंडेशन .महा. राज्य फुलगाव रुग्ण वाहिका लोकांच्या सेवेत देवा ग्रुप फाउंडेशन शाखा फुलगावं यांच्यातर्फे आज दिनांक 27 जून 2019 रोजी मान्यवरांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ विधानसभा आमदार संजय सावकारे तसेच राष्ट्रवादीचे उपजिल्हा अध्यक्ष राजेंद्र भाऊ विश्वनाथ चौधरी त्यांच्यासोबत प्रकाश भाऊ नारखेडे महेश सोनवणे तसेच एपीआय मॅडम रूपाली चव्हाण त्यांचे पती सचिन भाऊ कदम तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून
राजेंद्र साहेबराव चौधरी विलास महाजन माजी सरपंच फुलगाव आशिष शिंदे हे उपस्थित होते
यांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण सन्मानीय एपीआय सौ रूपालीताई चव्हाण व आमदार संजय सावकारे यांनी रुग्णवाहिकेचे फित कापून लोकार्पण केले मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन संपन्न झाले याप्रसंगी मान्यवरांचे स्वागत देवा ग्रुप तर्फे करण्यात आले पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करत
प्रथम एपीआय सौ रूपालीताई चव्हाण मॅडम यांनी देवा ग्रुप फाउंडेशन फुलगाव यांचे कार्याची स्तुती केली रुग्णवाहिके मुळे रुग्णांचे प्राण वाचतील कमी वेळेत रुग्णांना उपचार मिळतील असे मत त्यांनी व्यक्त केले
श्री राजेंद्र विश्वनाथ चौधरी माजी जिल्हा परिषद सदस्य माजी नगरसेवक व देवा ग्रुप फाउंडेशनचे मुख्य सल्लागार राजू भाऊ यांनी ग्रुप सदस्यांचे कौतुक केले तसेच
गावकऱ्यांच्या ग्रुपचे तथा गावकऱ्यांचे ऋण त्यांनी व्यक्त करत
तसेच देवा ग्रुप फाउंडेशन ला आर्थिक मदत देऊन रुग्णवाहिकेसाठी भविष्यात ऑक्सिजनचे सुविधा मिळेल असा मी शब्द देतो असे मत त्यांनी व्यक्त केले कार्यकर्त्यांनी आरोग्यदूत बनवून समाज सेवा करावी असे विचार त्यांनी प्रकट केले महेश सोनवणे समाज सेवक वरणगाव परिसर यांनी फुलगाव गावातील माजी सैनिकांचा उल्लेख करत गावाने देशसेवेसाठी मोठे योगदान केलेलं आहे तशाच प्रकारचे योगदान ग्रुप फाउंडेशन च्या सदस्यांनी आरोग्य सेवा लोकांना देऊन निस्वार्थ भावनेने काम करावे अशी सदिच्छा दिली त्यानंतर
कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र भाऊ साहेबराव चौधरी माजी जिल्हा परिषद सदस्य माजी सभापती भुसावळ यांनी मनोगतातून कार्यकर्त्यांनी समाजासाठी निस्वार्थ भावनेने काम करावे भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास मी ती सोडवण्याचा प्रयत्न करेल
असे आश्वासन देऊन कार्यक्रमाचा समारोपीय भाषण आपल्या भुसावळ तालुक्याचे लाडके आमदार मा. संजय भाऊ वामन सावकारे यांनी आपल्या मनोगतात देवा ग्रुप फाउंडेशन चा हा स्तुत्य उपक्रम आहे असे सांगितले तरुण पिढी व्यसन व्यसनाधीन ते कडे न जाता अशा समाज विधायक कार्यासाठी पुढे येत आहे याबाबत आनंद व्यक्त केला आपत्ती काळामध्ये रुग्णवाहिका चे महत्त्व अन्यसाधारण आहे ही वस्तुस्थिती आहे मात्र हे कार्य करीत असताना आपणास मोठ्या जबाबदारीने व जोखिमीने हे समाज उपयोगी कार्य करावे लागेल त्यासाठी ग्रुपचे संघटन खूप महत्त्वाचे आहे शासकीय पातळीवर मी
तालुक्यात कार्य करीत असतांना आमदार म्हणून शासनातर्फे भविष्यामध्ये तालुक्यासाठी आठ-दहा अंबुलन्स मिळवण्याचा प्रयत्न मी करणार आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले .

कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवा ग्रुप फाउंडेशन चे अध्यक्ष तिरुपती चौधरी सचिव वोमेश्वर (विशाल) चौधरी खजिंदार किरण सोनवणे व बाळा सोनवणे ,उमेश महाजन, मनोज जाधव, अमोल कोळी,तसेच सर्व सदस्य तसेच
महिला अध्यक्ष अनिता कोल्हे
उपाध्यक्ष योगिता बाऊसकर सचिव सुमित्रा चौधरी संघटक सोनिया पाटील खाजिंदार नंदा चौधरी कार्याध्यक्ष मंगला झोपे सह सचिव नलिनी पाटील प्रमुख सालागार पुष्पा पाटील सदस्य शुभांगी पाटील इतर ग्रुप सदस्या
यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी
अनमोल सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवा ग्रुप फाउंडेशन फुलगाव चे सचिव
वोमेश्वर (विशाल) चौधरी यांनी केले
सूत्रसंचालन श्री युवराज7 कुरकुरे यांनी तर आभार बंटी सोनवणे यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ माता-भगिनी उपस्थित होते
.

✍🏻दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण आपल्या परिसरातील बातमी 95940 47437 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपण आपल्या नावाने बातमी दिल्यास आमच्या दैनिक मध्ये प्रसिद्धी केली जाईल.
आपला विश्वासू
प्रशांत पाटील
भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
95940 47437
बातमी शेअर करा :
error: Content is protected !!