जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १६,देवीदास कॉलनी व लाठी शाळे जवळील परिसरात अमृत योजनेच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांनी उतरविली अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांची आरती.

नागरिक त्रस्त अधिकारी मस्त

दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव प्रतिनिधी शैलेंद्र ठाकूर.

जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १६ , देवीदास कॉलनी व लाठी शाळे जवळील परिसरात अमृत योजनेच्या निकृष्ट दर्जाच्या अर्धवट कामा मुळे नागरीकांनी संताप व्यक्त करत अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांची शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आरती ओवळली.

खराब रस्ते, खड्डे तसेच धुळीमुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. बरेच नागरिक पावसामुळे होत असलेल्या खराब रस्त्यावरून खड्ड्यात पडत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आयुष्य धोक्यात आहे. त्यासंदर्भात नागरिकांनी आज नगरसेवक तसेच अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांना समस्या मांडण्यासाठी बोलावले असता. नागरिकांनी संताप व आक्रोश व्यक्त करत अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांची खराब रस्ते, खड्डे व खराब काम केल्यासाठी अक्षरक्षा आरती उतरविली. खराब कामांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे नागरिकांनी नगरसेवक तसेच संबंधित अधिकाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहिली. नगरसेवक लोक वार्डातील काम पूर्ण करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांना पाठपुरावा करत नसल्याचे नागरिकांकडून म्हटले जात आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!