वरणगाव शहर लगत दुरावस्था झालेला रस्ता तयार करा अन्यथा महामार्गाचे एकही वाहन शहरातून जाऊ देणार नाही –
दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी प्रशांत पाटील
वरणगाव येथील तात्काळ सात मोऱ्या पुलाची केली स्वछता
रस्ते कामाला सुरुवात करणार
प्रकल्प संचालक श्री सिन्हा यांचे सहकार्य
वरणगाव शहरातून साई बाबा मंदिर बसस्थानक चौक ते फुलगाव फाटा पर्यंत चा रस्ता रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था होऊन खराब झालेला आहे पावसाळ्यातील पाणी त्या खड्ड्यात साचत असल्याने वहान धारकांना अंदाज येत नसल्याने वाहनांचे अपघात होत असुन महामार्गाचा रस्ता तात्काळ तयार करा तसेच सात मोऱ्या वरील भोगावती नदीच्या पूलावर माती साचल्याने पहिल्या पावसात च पाणी साचल्याने नागरिकांना जाता येत नव्हते मातीचा गाळ साचून अनेक वाहने स्लीप होऊन पडले अनेक जखमी झालेले आहे वरणगाव शहरात येण्यासाठी हाच एक रस्ता असुन आसपासच्या परिसरातील नागरिकांना या खड्डे पडलेल्या रस्त्याचा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता
या अनुशंघाने आज भाजपा च्या वतीने माजी नगराध्यक्ष सुनील काळे सुनील माळी ऍड ए जी जंजाळे मिलिंद भैसे हितेश चौधरी दीपक चौधरी पप्पू ठाकरे किरण वंजारी हर्षल चौधरी राहुल जंजाळे विनय अग्रवाल रिक्षा चालक मालक चे किरण भैसे कार्यकर्ते पुलावर 1 तास ठिय्या मारला व फुलगाव फाटा ते साईबाबा मंदिर दरम्यानचा खराब झालेला रस्ता तयार करा व पुलाची स्वछता करा अशी मागणी करत प्रकल्प संचालक श्री सिन्हा यांच्याकडे मागणी लावून धरली व श्री सिन्हा यांनी प्रकल्पाचे अभियंता संदीप कुमार यांना पाठविले असता तात्काळ जेसीबी मशीन आणि मजूर कामगार पाठवुन पुलावरील माती साफ केली व पाईप मोकळे केले तसेच खराब झालेला रस्ता तात्काळ तयार करा अन्यथा वरणगाव शहरातून महामार्गाचे एक ही वाहन चालू देणार नाही अशी कडक भूमिका माजी नगराध्यक्ष सुनील काळे व भाजपा कार्यकर्त्यांनी घेतली तेव्हा तात्काळ श्री संदीप कुमार यांना निवेदन दिले व
प्रकल्प संचालक श्री सिन्हा यांनी लगेच रस्ता दृस्ती च्या कामाला सुरुवात करत व लवकरच साईबाबा मंदिर ते फुलगाव रस्ता हा दुरुस्त करण्यात येणार असे आश्वासन भाजपा कार्यकर्तेंना देण्यात आले यावेळी येथे मोठ्या संख्येने कार्यकर्तेची उपस्थिती दिसुन आली.