शेतकऱ्यांची गैरसोयीची दखल घेवुन प्रकरणे मार्गी लावा – आ. चिमणराव पाटील

पारोळा प्रतिनिधी –

मतदारसंघातील ज्या पिक विमा धारक शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदविल्या असतील त्या सर्वाँना पिक विमा योजनेचा तातडीने लाभ देण्यात यावा, येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांचा बँक खात्यात थेट अनुदान जमा करण्यात यावे,यासाठी कुठल्याही शेतकऱ्यांची इतरत्र भटकंती अथवा गैरसोय न होता प्रकरणे मार्गी लावून खबरदारी घ्यावी असे आमदार चिमणराव पाटील यांनी आयोजीत बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.बैठकीत पारोळा तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय डमाळे,एरंडोल तालुका कृषी अधिकारी गंभीरे,नायब तहसीलदार एस के पाटील,पिक विमा तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर रामोशी,पिक विमा एरंडोल तालुका प्रतिनिधी चेतन पाटील उपस्थित होते.
पी एम किसान योजने संदर्भात शेतकऱ्यांना मोठी गैरसोय होतांना दिसत आहे,सर्व आवश्यक कागदपत्रे पुरविल्यावर ही योजनेचा बऱ्याच शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही,त्यासाठी त्यांना तहसिल कार्यालय,सी एस सी सेंटर येथे फेऱ्या माराव्या लागत आहे.शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर करून उपाययोजना करण्याच्या सुचना ही आमदार पाटील यांनी यावेळी दिल्या. याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकर पाटील,शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष विजय पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!