राष्ट्रवादी युवक काँग्रेस मंठा उपाध्यक्षपदी कुणाल कमळकर….
मंठा प्रतिनिधी – ( बाळासाहेब खराबे पाटील )
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या मंठा तालुका उपाध्यक्ष पदी कुणाल कमळकर यांची निवड करण्यात आली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार धेयधोरण तळागाळापर्यंत सर्वसामान्य पर्यंत युवकाच्या हाती घड्याळाची साथ मजबूत करण्याकरिता जालना येथे आढावा बैठक घेण्यात आली मधुर वेंकट हॉल मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील, माजी आरोग्यमंत्री राजेश भैय्या टोपे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष कपिल भैय्या आकात, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांच्या उपस्थितीत मंठा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी कुणाल कुंडलिकराव कमळकर यांची निवड करण्यात आली. यावेळी माध्यमांशी बोलताना कमळकर म्हणाले की, गावा गावात राष्ट्रवादीचे विचार पोहोचवीन आणि युवकाच्या मनोमनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांचे विचार पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते.