सरकारने शेतकऱ्यांच्या कांद्याला हमी भाव निश्चित करावा – माजीमंत्री आमदार धनंजय मुंढे
जुन्नर प्रतिनिधी – ( मनोहर हिंगणे )
[ बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मेडिक्लेम पॉलिसी उपलब्ध करून द्या— आमदार अतुल बेनके ]
शेतकरी अडचणीत असताना शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमी सहकार्य करून मदतीला धावून आले आहे.कांदा उत्पादक शेतकरी बाजारभाव ढासळल्याने फार मोठ्या अडचणीत आला असून केंद्र सरकारने निर्यात शुल्क कमी करून निर्यात क्षमता वाढवावी त्यासोबत कांद्याला हमीभाव निश्चित करावा.पंजाब व हरियाणा च्या शेतकऱ्यांनी एक वर्षभर लढा उभारला ज्यायोगे केंद्र सरकारला कायदे मागे घ्यावे लागले मग महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी मागे का ? असा सवाल माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांनी ओतूर येथील कांदा प्रश्नी शेतकरी जनअक्रोश आंदोलन सभेत उपस्थित शेतकऱ्यांना केला.विद्यमान महाराष्ट्र सरकार देवांचा आशीर्वाद घेण्यात मग्न असून
बाळासाहेब ठाकरे यांचा आशिर्वाद सरकारच्या मागे की उद्धव ठाकरे यांच्या मागे यातच रस्सी खेच सुरू झाली आहे मात्र जनतेचा आशिर्वाद सुटला तर रस्त्यावर याल. शेतकऱ्यांचा आवाज मांडण्यासाठी शरद पवार,अजित पवार,सुप्रिया सुळे यांनी शक्ती दिली आहे असे उदगार काढले.
ओतूर ता:-जुन्नर येथील कृषि उत्पन्न बाजार समिती च्या आवारात मंगळवार दि:-१३ सप्टेंबर रोजी आमदार अतुल बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले यावेळी अतुल बेनके म्हणाले की तालुका शरद पवार यांच्या सहकार्याने सुजलाम सुफलाम करण्यात यश मिळाले मात्र २०१४ नंतर कांदा उत्पादक शेतकरी पूर्णतः उद्धवस्त झाला असून कांदा पिकासाठी एकरी भांडवल खर्च वाढला असून मात्र बाजारभाव काय मिळत नाही. जीएसटी लागू झाला इतर कर आकारणी वाढली मात्र निर्यात मार्च पर्यंत ३८% होणे आवश्यक असून ती ८%एवढीच राहिली त्यातही निर्यात शुल्क अधिक असल्याने समस्या वाढत आहेत.यावेळी आमदार अतुल बेनके म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मेडिक्लेम व जीवनविमा काढून संरक्षण करावे असेही यावेळी आमदार बेनके यांनी सभापती संजय काळे यांना सुचविले तर जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनीही यास मान्यता देऊन शेतकरी वर्गाला खुश केले.
यावेळी शेतकरी संघटनेचे प्रमोद खांडगे, सुदाम घोलप, संतोष तांबे,जुन्नर तालुका शेतकरी नेते अंबादास हांडे,लक्ष्मण शिंदे,राजेंद्र फापाळे,तान्हाजी बेनके,अशोक घोलप,संजय काळे यांनी मनोगत व्यक्त केले. या कांदा आंदोलन प्रसंगी विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर,पांडुरंग पवार,मोहित ढमाले,अंकुश आमले,विशाल तांबे, बाजीराव ढोले,उज्वला शेवाळे,गीतांजली पानसरे, सूरज वाजगे,अक्षदा मांडे,अभिषेक वलव्हणकर,प्रशांत डुंबरे,भाऊ कुंभार,वैभव तांबे, तुषार थोरात,जालिंदर पानसरे,शेतकरी संघटनेचे तालुकाअध्यक्ष संजय भुजबळ,प्रभाकर शिंदे,ओतूर मंडल आधिकारी विजय फलके,विविध गावचे सरपंच,उपसरपंच विविध सोसायट्यांचे चेअरमन, व्हा चेअरमन,संचालक व शेतकरी वर्ग व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी कल्याण-नगर महामार्गावर धोलवड चौकात रास्तारोको करण्यात आला व कांदा आंदोलन प्रश्नी वाय.जी.गायकर यांनी शेतकरी हिताचे मनोगत व्यक्त केले. यावेळी तहसीलदार रविंद्र सबनीस यांना निवेदन देण्यात आले.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जयप्रकाश डुंबरे यांनी केले.