“संत निरंकारी मिशन द्वारा ओतूर येथे स्वच्छता अभियान संपन्न…!

जुन्नर प्रतिनिधी -( मनोहर हिंगणे )

ओतूर येथे निरंकारी ‘सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज’ यांच्या कृपाशिर्वादाने ‘संत निरंकारी मिशन’ ची सामाजिक शाखा ‘संत निरंकारी चॅरीटेबल फाऊंडेशन’ द्वारा मंगळवार, दि.२३ ऑगस्ट २०२२ रोजी ओतूर येथे भव्य स्वच्छता अभियान संपन्न झाले. या स्वच्छता अभियानाचे उदघाटन श्री कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थाचे अध्यक्ष श्री.अनिलशेठ तांबे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. संत निरंकारी मिशनचे आळेफाटा विभाग प्रमुख श्री चंद्रकांत कुऱ्हाडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सौ.गिताताई पानसरे व उपसरपंच प्रशांत डुंबरे.यांच्यासह गावातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते .

तत्कालीन सद्गुरू निरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज यांची शिकवण आहे , “प्रदूषण आतील असो की बाहेरील , दोन्हीही हानिकारक आहे” या उक्तीला सार्थ ठरवत या अभियानात स्वयंसेवकांनी स्वच्छता दूत बनून जुन्नर तालुक्यातील अग्रगण्य ओतूर या गावचे ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वर मंदिर परिसरात श्रावणी सोमवार निमित्त झालेल्या यात्रेतील कचरा, पार्किंग परिसराची साफ सफाई करण्यात आली .

उदघाटन प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच म्हणाले की, ‘संत निरंकारी मिशन दरवर्षी अश्याच प्रकारे आमच्या ग्रामपंचायतीला नेहमी सहकार्य करतच असतात आणि ‘मानव सेवा, हीच ईश्वर सेवा’ यांचे ब्रीद समजून आमच्या भागात वेगवेगळे उपक्रम राबवत असतात.’

संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे अनेक उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी, नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.या अभियानामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे स्वागत व आभार श्री मनोज तांबे यांनी मानले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!