पारोळ्यात एक पुरणपोळी गरिबांसाठी उपक्रमाला जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद….
पारोळा प्रतिनिधी – ( प्रकाश पाटील )
होळी सणानिमित्त पारोळा शहरात शहरावासीयांकडून पुरणपोळी आणि खीरी चे संकलन करून गोरगरिबांची होळी गोड साजरी करण्याचा उपक्रम सद्गुरू महिला मंडळ आणि सामाजिक संघटना यांच्या तर्फे शहरात राबविण्यात आला.या उपक्रमाला पारोळा शहरवासीयांनी उस्फुर्त प्रतिसाद देत शेकडो पुरण पोळी उपलब्ध करून दिल्या,तर एका तरुणाने स्वतः खर्च करत पुरणपोळ्या विकत आणून माणुसकीचा धर्म पाळला.या उपक्रमामुळे गोरगरिबांमध्ये आनंदाचे वातावरण बघावयास मिळाले.
श्रीमंत व मध्यम वर्गातील लोक आनंदाने सण उत्सव साजरा करतात आणि पंचपक्वान्नाचे भोजन करतात.परंतु आपल्याकडे अनेक गोरगरीब आहेत त्यांना एक वेळचे जेवण देखील मिळत नाही.
यां उपक्रमासाठी सद्गुरू महिला मंडळाच्या संचालिका सुवर्णा पाटील यांनी अपार मेहनत घेतली आहे.सदर उपक्रमास प्रा विकास पाटील,भिम आर्मीचे -जितेंद्र एम वानखेडे, छावा चे विजय पाटील,
प्रा शैलेश पाटील सर,राकेश बोरसे,जयश्री सळी,अन्नपूर्णा पाटील, गायत्री महाजन,मनीषा सोहनी,स्वाती शिंदे,सुरेखा शिंपी, जिजाबाई पाटील,जानवी पाटील आशाबाई माळी,सुनंदा शेंडे यांच्यासह मोठा महादेव चौक मित्र मंडळ,व्यापारी महासंघ,पतंजली योग समिती, शीतल अकॅडमी,संजय गांधी निराधार समिती, पंचकर्म सेन्टर, गावहोळी चौक मित्र मंडळ यांनी सहकार्य केले.
पुरणपोळी संकलन करून गोरगरिबांची होळी गोड करणाऱ्या या उपक्रमाचे पारोळा शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.