पारोळा येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करा….

( कोट -जिल्हा टॅक्सी महासंघाची मागणी )

पारोळा प्रतिनिधी – ( प्रकाश पाटील )

जळगावच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला बढती मिळून ते प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात रूपांतरित होत आहे,त्यामुळे पारोळा शहर व तालुक्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व्हावे अशी मागणी जळगाव जिल्हा टॅक्सी चालक मालक महासंघाचे अध्यक्ष मधुकर धोंडू कासार यांनी परिवहन मंत्री ना अनिल परब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे,जळगाव व धुळे शहराच्या मधोमध राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पारोळा हे गाव वसलेले आहे,राजकीय दृष्ट्या परिपूर्ण असलेल्या या गावात कोणतेही मोठे उद्योग-धंदे नसल्याने बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे,येथे कोणतेही कारखाने कार्यालय फॅक्टरी असल्याने बेरोजगारीचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याने चिंतेचा विषय झालेला आहे,मात्र जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे रूपांतर प्रादेशिक परिवहन कार्यालयात होत असल्यामुळे उपप्रादेशिक कार्यालय जिल्ह्यातील दुसऱ्या तालुक्यात होऊ शकते त्यामुळे चालक-वाहक मालकांचे व अनेकांचे मते मतांतरे घेतले असता जळगाव जिल्हा मोठा असून १५ तालुक्यांच्या जिल्ह्यात समावेश आहे,तसेच जळगाव व धुळे जिल्ह्याच्या मध्यभागी पारोळा शहर व तालुका असल्याने पारोळा शहराच्या एका बाजूला अमळनेर २० किमी, चोपडा ५० किमी ,धरणगाव २० किमी, एरंडोल २२ किमी तर दुसर्‍या बाजूस भडगाव ३० किमी, पाचोरा ४५ किमी,कजगाव ३५ किमी व चाळीसगाव ५० किमी आहे म्हणजेच भौगोलिक दृष्ट्या पारोळा शहर मध्यवर्ती ठिकाणी असल्याने वाहन मालकांना आर टी ओ च्या कामासाठी व इतर कोणत्याही शहरापेक्षा मध्यवर्ती असल्याने वाहन मालकांच्या डिझेलच्या खर्च वाचेल तसेच वेळ व श्रम वाचतील तरी उपप्रादेशिक कार्याच्या विचार करताना पारोळा शहराचा प्राधान्याने विचार करावा अशी मागणी जळगाव जिल्हा टॅक्सी चालक – मालक संघाच्यावतीने होत असून पारोळा येथे उपप्रादेशिक कार्यालय झाल्यास ५० ते ७० कर्मचारी व अधिकाऱ्यांना रोजगार उपलब्ध होऊन कार्यालयाचे काम करणारे शंभर ते दोनशे खाजगी बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल यासाठी आ.चिमणराव पाटील,माजी मंत्री डॉ.सतीश पाटील ,मा खा ॲड.वसंतराव मोरे ,मा खा ए टी नाना पाटील,जिल्हा बँक संचालक अमोल पाटील,जिल्हाप्रमुख डॉक्टर हर्षल माने ,नगराध्यक्ष करण पवार, माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे,चंद्रकांत पाटील सुरेंद्र बोहरा आदींनी पारोळ्यात आर टी ओ कार्यालय अर्थात उपप्रादेशिक कार्यालय यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी टॅक्सी चालक मालक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!