जामले वणीत पाण्याच्या टाकीचे लोकार्पण..
त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी – ( पांडुरंग दोंदे mob.-8010693873 )
कळवण तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जामले वणी येथे आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त आपली आपुलकी संस्थेच्या वतीने पाण्याच्या टाकीचे लोकार्पण डॉ. जीवन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
नाशिक येथील आपली आपुलकी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष खंडेराव डावरे यांनी राघोजी भांगरे यांच्या स्वातंत्र्य लढ्याची शौर्यगाथा सांगीतली. सार्वजनिक जलकुंभ नादुरुस्त असल्याने जामले वणीच्या महिलांना दोन किलोमीटर अंतराची पायपीट करून डोक्यावर पाणी घेऊन यावे लागत होते. याबाबत नवनाथ गांगोडे यांनी आपली आपुलकी संस्थेशी संपर्क पाठपुरावा केला.याकरिता विश्व वल्लभ आयुर्वेदिक गुरुकुला मार्फत पाच हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी देऊन जामले वणीचा पाण्याच्स प्रश्न मिटविला. यावेळी डॉ. जीवन जाधव यांच्या हस्ते जलकुंभाचे लोकार्पण करण्यात आले.
आपली आपुलकी संस्थेतर्फे पोलिस भरती, स्पर्धा परिक्षेच्या पुस्तकांचे पंधरा विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी वर्षा जमदडे, डॉ. प्रीतम कळवणकर, ईनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा वैशाली चौधरी, सरपंच ललीता भरसट, लीला भंडारी प्रमुख पाहुण्या होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी धनराज ठाकरे, देवीदास गांगोडे, भालचंद्र गांगोडे, यांनी परीश्रम घेतले. भगवान गांगोडे यांनी सुत्रसंचालन केले. प्रीतम कळवणकर यांनी आभार मानले.