कोटमगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाऊसाहेब विश्वनाथ पवार यांची बिनविरोध निवड..

निफाड प्रतिनिधी – रामभाऊ आवारे

निफाड तालुक्यातील कोटमगाव या प्रगतशील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाऊसाहेब विश्वनाथ पवार यांची रोटेशन पद्धतीने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सरपंच तुकाराम गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व जागा निवडून आल्यामुळे आज तुकाराम गांगुर्डे गट कोटमगाव ग्रामपंचायतीच्या सत्ता स्थानी असून लोकनियुक्त सरपंच म्हणून तुकाराम गांगुर्डे निवडणुकीत सरपंच पदी निवडुन आले आहे.
निवडणुकीच्या वेळेस ठरवुन दिलेल्या मुदतीत उपसरपंच सौ आशा दामोधर शिरसाठ यांनी आवर्तनानुसार राजीनामा दिल्याने उपसरपंच निवडणुकीसाठी ग्रामपंचायत सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक एस.एस. धिवर व सरपंच तुकाराम निवृत्ती गांगुर्डे यांच्या अध्येक्षते खाली उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेतली असता उपसरपंचपदासाठी भाऊसाहेब विश्वनाथ पवार यांच्या नावाची सूचना ग्रा पं सदस्य भाऊसाहेब केशव पवार यांनी केली.मुदतीत उपसरपंच पदासाठी भाऊसाहेब विश्वनाथ पवार एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक एस.एस. धिवर यांनी घोषित केले.यावेळी बैठकीस ग्रा पं सदस्य रामसिंग वाळू कडाळे, सागर रोहिदास खैरनार,सौ. मंगला मुकुंद काळे, इंदुबाई उत्तम गांगुर्डे, मनीषा बाळासाहेब काळे,मावळत्या उपसरपंच आशा दामोधर शिरसाठ व ईतर ग्रामस्थ श्री.वसंतराव रामचंद्र पवार, नंदूराम पांडुरंग सुपेकर, सोपान शंकर पवार, रामदास वाळू गांगुर्डे, कैलास वाळू शिरसाठ, तेजराज गणपत गांगुर्डे,आदी उपस्थित होते.
भाऊसाहेब विश्वनाथ पवार यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे घोषित करताच समर्थकांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांच्या आतषबाजी व अनोंदोत्सव साजरा करण्यात आला या वेळी श्री.मुकुंद काळे, राजेंद्र केंदले, एकनाथ गुरगुडे, तुकाराम भिलोरे, विनायक पवार,मंजिराम रहाणे, नाना कडाळे,प्रकाश भिलोरे, जगन पवार, प्रमोद पवार, सुमंत, करवाल,धनजय जगताप, सादिक मुलाणी, संतोष गांगुर्डे, रामदास गांगुर्डे, अभिषेक गांगुर्डे, अमोल मोरे, सचिन गोसावी, योगेश बाळासाहेब मोरे, किरण पवार, श्रीराम पवार, नवनाथ गांगुर्डे, दीपक शिंदे, संतोष गायकवाड, प्रविण कदम, आतिष केदारे,आदींसह तरुण मित्र मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक एस.एस. धिवर यांनी काम पाहिले. शेवटी ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच व मावळते सरपंच यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कोटमगाव ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणार–
गावाचा सर्वांगीण विकास हवा व तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून त्यांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून त्यांच्या पाणी, शिक्षण व आरोग्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविणार असून उपसरपंच पदाची जबाबदारी मी आपल्या सर्वांच्या सहकार्याने सार्थ ठरवील. जनता जनार्दनाने आजपर्यंतची सहकारी केली तसेच सहकारी या पुढील काळात असू द्यावे.आपल्या गावाचा सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजना सर्व लाभार्थ्यांना कशा मिळवून देता येतील यासाठी आपण प्रयत्न करणार आहे.

भाऊसाहेब पवार नवनिर्वाचित उपसरपंच (कोटमगाव)

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!