थेरोळा येथील रविंद्र पाटील यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या युवा तालुका संघटक पदी निवड..
धामोडी प्रतिनिधी – ( राहुल जैन )
थेरोळा ता.रावेर येथील रहिवासी रवींद्र पाटील यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास दाखवत त्यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या युवा रावेर तालुका संघटक पदी नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात नियुक्ती करण्यात आली.31/10/2021 रोज रविवार कृषी महाविद्यालय निंभोरा ता.रावेर येथे कार्यक्रम संपन्न झाला याबाबत सविस्तर माहिती अशी, या कार्यक्रमात सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करून , भारताचे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करून प्रतिमा पुजन करून पुष्पहार सर्व मान्यवरांनी घातले , तसेच भारताचे माजी पंतप्रधान आर्यन लेडी स्व इंदिरा गांधी यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कुषी महाविद्यालय वडगाव रोड निंभोरा स्टेशन येथे अखिल भारतीय मराठा महासंघ रावेर तालुका यांच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकारी नियुक्ती व अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता ,या कार्यक्रमाचे अध्यक्ष रावेर तालुका मराठा समाज विकास मंडळाचे विद्यमान संचालक संतोषराव महाजन, तर प्रमुख पाहुणे म्हणून
प्रा.दिव्यांक सावंत माजी जिल्हा संपर्कप्रमुख,अ.भा. मराठा महासंघ, जळगांव जिल्हा अतुल सोनवणे उपजिल्हाध्यक्ष,अ.भा.मराठा महासंघ, अँड धनराज पाटील रावेर, अँड देवकात पाटील,यावल, प्रमोद कोंडे माजी पंचायत समितीचे सदस्य रावेर,विक्की पाटील यावल तालुका अध्यक्ष, माजी संरपच निंभोरा सुभाष पाटील, माजी सरपंच छोटू पाटील रेंभोटा, वडगाव संरपच धनराज पाटील,मुंजलवाडी संरपच योगेश पाटील, गौरखेडा ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटील, कुषीभूषण ज्ञानेश्वर पाटील,गहूखेडा कैलास येवले, सुनिल राऊत कोचूर,
जळगांव जिल्हा दिपक राज पाटील सावदा जिल्हा सरचिटणीस,अ.भा. मराठा महासंघ,जळगांव जिल्हा प्रल्हाद पाटील युवक जिल्हा उपाध्यक्ष,अ.भा.मराठा महासंघ जळगांव जिल्हा यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती,तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास ताठे यांनी करून दिव्यंग सावंत, दिपक राज पाटील, अँड धनराज पाटील अँड देवकात पाटील, छोटू पाटील, सुभाष महाराज, यांनी मनोगत व्यक्त केले . यात प्रामुख्याने मराठ्यांसाठी आचार संहिता, पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले, त्यांचे वाचन करून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित मुंबई अंतर्गत योजना, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे, राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता याविषयीची सविस्तर माहिती देवून रावेर तालुक्यातील अनेक खेड्यात पाड्यातील तरुणांना स्फूर्तीदायी , प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमासाठी रावेर तालुका अध्यक्ष विलास ताठे, जिजाबराव महाजन, प्रमोद कोंडे, किरण पाटील, गौरव महाजन,जयेश पाटील,अक्षय सोनवणे, महेंद्र पाटील, मयूर महाजन, प्रल्हाद पाटील, निखिल चौधरी, प्रशांत काठोके, अमोल गिरडे, निवृत्ती चौधरी, सुनिल पाटील, मिलन कोंडे, जयेश शाहापुरे, शुभम कराड, ललित महाजन यांनी परिश्रम घेतले तर आभार अक्षय सोनवणे यांनी मानले.तर मोठ्या संख्येने तरुणांची उपस्थिती होती.
____________________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण धामोडी परिसरातील बातमी 8390382664 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
राहुल जैन
धामोडी परिसर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-8390382664