विद्यार्थी दिनानिमित्त तळेगावला शालेय साहित्य वाटप..
त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी – ( पांडुरंग दोंदे mob- 8010693873 )
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एकमेव विद्यार्थी आहेत. ज्यांचा शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांनी 7 नोव्हेंबर 1900 रोजी सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला होता.
या विद्यार्थी दिनानिमित्त त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथे दि. 7 नोव्हेंबर रोजी येथील सामाजिक कार्यकर्ते काळु गांगुर्डे यांनी गावातील आदिवासी,बौद्ध समाजातील ईयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या एकूण 50 विद्यार्थ्यांना वही पेन असे शैक्षणिक साहित्य वाटप केले.व विद्यार्थ्यांकडून वाचन व लिखाण करून घेतले. दिवाळीच्या सुट्टीत शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांत समाधान पसरले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते काळु गांगुर्डे व विद्यार्थी उपस्थित होते.