रावेर तालुका शिवसेनेच्या वतीने दिले निवेदन..

रावेर – शहर प्रतिनीधी–

दि . ७ नोव्हे आज रावेरतालुका शिवसेना यांनी प्रल्हाद महाजन शिवसेना उपजिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वात रावेर पोलीस स्टेशन API विशाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले
सविस्तर वृत्त असे की जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात अर्वाच्य भाषेचा वापर करीत सोशल मीडियावर .काही अर्वाच्च भाषेचा वापर केल्याने महाराष्ट्रभर व जिल्ह्यात नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांच्याविरोधात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे त्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणेविरोधात ताबडतोब गुन्हा दाखल करावा व अटक करावी तसेच असे न झाल्यास रावेर तालुका शिवसेना तीव्र आंदोलन करेल असा सुचक .इशारा रावेर शिवसेना तालुकाध्यक्ष योगीराज पाटील . श्री .अशोक शिंदे , ‘ श्री .रवी पवार सर , श्री .प्रवीण पंडित , श्री . नितीन महाजन , राकेश घोरफोडे व श्याम भांबरे यांनी दिला आहे सदर हे निवेदन रावेर API विशाल सोनवणे यांनी स्वीकारले..

_____________________________________________________

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!