एस.बी.सी.संघर्ष समिती द्वारे आ. शिरीष दादा चौधरी यांना निवेदन..

थोरगव्हाण – ( प्रतिनिधी )

यावल मतदार संघाचे आ शिरीषदादा चौधरी यांना नुकतेच
आरक्षण बचाव संदर्भात समितीने निवेदन दिले.
संपूर्ण राज्यात एस. बी. सी .संघर्ष समिती द्वारे आंदोलन छेडले गेले असून त्याचाच भाग म्हणून राज्यभरातील सर्व सन्मानीय आमदार आणि खासदार यांना निवेदन दिले जात आहे.राज्यातील आरक्षण ५०℅ वर जात असून यामुळे एस. बी .सी. आरक्षण धोक्यात आले आहे. भविष्यात ही एस .बी. सी. धारकांना धोक्याची घंटा असून यामुळे आरक्षण गेल्याचा फटका कोष्टी , साळी आदी समाजाला बसू शकतो , म्हणून राज्यभरात अश्या स्वरूपाचे निवेदन दिले जात आहे.
खिरोदा येथे समितीद्वारे सन्मानीय आ. शिरीष दादा चौधरी याना निवेदन देण्यात आले , यावेळी समितीचे प्रा.नंदन वळींकर ,नानासाहेब घोडके , मुकेश घोडके ,पराग धनोरे ,गुलाब देवांग , मिलिंद कानडे आणि प्रा योगेश कोष्टी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!