अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे सलग सहाव्या वर्षी सातपुड्यात ३७५ जणांना दिले दिवाळेची अनोखी भेट..

रावेर शहर प्रतिनीधी – ( ईश्वर महाजन )

दिवाळी हा सण प्रत्येकांच्या जीवनात एक नवीन रोषणाई पर्व तसेच आपल्या प्रत्येकास नव चैतन्य आणण्यास पर्व होय
त्या निमीत्ताने अंर्तनाद प्रतिष्ठान यांच्या वतीने सातपुड्यातील यावल तालुक्यातील अतिदुर्गम अश्या पाड्यात आज फराळ वाटप नवीन कपडे देवुन आपण हया सामाजिकदृष्ट्या अश्या लोकासाठी आपले काही देण होय त्यांच सकल्पनेतुन गेल्या सहा वर्षा पासुन अश्या एक भागात जाऊन तिथे अशे उपक्रम अर्तनाद प्रतिष्ठान आपल्या भागातील मान्यवर दाते यांना हया संकल्पने विषयी माहीती सांगुन त्यांच्या मार्फत
सातपुड्यातील डोंगरदे येथे उपक्रमात अनोखा प्रतिसाद मिळाला
जळगाव जिल्हातील भुसावळ तालुक्यातील

भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठान वतीने यावल तालुक्यातील डोंगरदे येथे सामूहिक दिवाळी साजरी करण्यात आली. त्यात २०० कुटुंबातील मुला-मुलींना नवीन कपडे, महिलांना साड्या, स्वेटर,शैक्षणिक उपयोगी साहित्य,तांदूळ, पणत्या, बिस्किट, चॉकलेट आणि नविन चपला, बुट यांचे वाटप करण्यात आले
दिपावलीच्या महा पर्वा निमित्ताने अंतर्नाद तर्फे ‘एक वाटी फराळ व नवीन कपडे द्या आणि वंचितांची दिवाळी गाेड करू या’ असे आवाहन करण्यात आले हाेते. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला.या उपक्रमांतर्गत गाेळा करण्यात आलेले साहित्य व फराळ यावल तालुक्यातील डोंगरदे येथील आदिवासी पाड्यात वाटप करण्यात आले हया उपक्रमास दाते म्हणुन लाभलेत ते पुढील प्रमाणे होय
रवींद्र निमाणी, निखिल देसाई, नितीन फेगडे, जयश्री शेलार, ललित पाटील, रघुनाथ सोनवणे, किशोर पाटील,हरीश फालक, डॉ.पंकज राणे, डॉ.नीलिमा नेहते, मनोज फालक, विनोद अग्रवाल, किशोर हडपे, भूषण कोटेचा, निलेश वारके, वर्षा पाटील, कविता जगपती, शरद हिवरे, भरत बऱ्हाटे, सचिन पाचपांडे, लैलेश मास्टे, जय पाठक, जयकिशन टेकवाणी, ज्योती साठे, नगरसेवक किरण कोलते, परिक्षीत पवार, ज्ञानेश्वर मोरे, सागर मोहरील, सरला पाटील, भाग्यश्री भंगाळे, राजू गायकवाड, दिलीप सूर्यवंशी, नितीन वाणी, गिरीराज फेगडे, श्रीकांत मोटे, हेमंत बोरोकर, संजय मोताळकर, पंकज ढाके, भास्कर चिमणकर, विजय नेहते, मनमोहन करसाळे, विलास बेंद्रे, पवन कलापुरे, संदिप पाटील, युवराज पाटील, मुकेश बोरोले, विकास वारके, रवींद्र परदेशी, छाया पाटील, क्रांती सुरवाडे, मिलिंद सुरवाडे, दिपाली सोनार, आबिद शेख, किरण पाटील, पंकज चौधरी, ज्ञानेश्वर मेडिकल, ज्योती बेलसरे, राजेंद्र ढाके,अमोल जावळे, दिलीप चौधरी, संजय सुरवाडे, अलका देवगिरीकर, प्रकाश कासार, भारती अवचारे, धीरज बाणाईत, हितेश नेहते, वरुण इंगळे, सुनिल पटेल, ललित फिरके, विनोद चोरडिया, अरुण फेगडे, प्रवीण पाटील, सुनिल कोंघे, किरण काकर, पल्लवी ढाके, दीपक चौधरी, मंगेश बाविस्कर, पप्पू वानखेडे, गिरीश महाजन, बि एन पाटील, शहजाद पटेल, राम काळे,विलास बेदारे,जयश्री काळवीट,प्रतिमा राणे, राजेंद्र सुरवाडे, महेंद्र भंगाळे , के टी तळेले, महेंद्र किनगे, पि एस नेमाडे, धिरज चौधरी या दात्यांचे सहकार्य लाभले.

प्रकल्प प्रमुख योगेश इंगळे समन्वयक प्रदीप सोनवणे, तर सह समन्वयक समाधान जाधव, अमित चौधरी हे हाेते. श्रीकांत जाेशी , मेहरबान तडवी, संजय भटकर, देव सरकटे, प्रसन्ना बाेराेले, आरीफ तडवी, गणेश जावळे, जीवन महाजन, प्रा.श्याम दुसाने, निवृत्ती पाटील, भूषण झाेपे,अमितकुमार पाटील, कुंदन वायकोळे, राजू वारके, हरीश भट, हेमंत बोरोले, राजेंद्र जावळे, सचिन पाटील, तेजेंद्र महाजन,संदिप रायभोळे, शैलेंद्र महाजन, रोहिदास सोनवणे,शशिकांत राणे,रमेश गाजरे,हेमंत बोरोले, दीपक जावळे, प्रमोद पाटील, जयंत चौधरी, अमित नागराणी,मिलिंद राणे, सुशील पाटील, दीपक सोनवणे, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते.
ह्या सर्व परिवार व
चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आंनद बघुन मनात समाधान ची वाटत होते सातपुड्यातील ह्या
पाड्यावरील चिमुकल्यांना नवे कपडे मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले हाेते. वाड्या-वस्त्यांवरील कुटुंबीयांसाेबत दिवाळी साजरी केल्याचा आनंद हा शब्दातीत आहे, अशी भावना अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केली. ह्या उपक्रमास मिळाणाऱ्या वाढता प्रतिसाद यामुळे मुळ संकल्पनेस एक मोठा दिलासा मिळत आहे
‘वाटीभर फराळ आणि कपडे द्या’ या उपक्रमाला यंदा दात्यांकडून प्रंचड असा प्रतिसाद लाभला. त्यामुळे त्यास व्यापक स्वरुप मिळाले आहे. भविष्यात हा उपक्रम लाेकचळवळ व्हावा, या अनुषंगाने प्रयत्न करू, अशी ग्वाही प्रकल्प प्रमुख योगेश इंगळे, समन्वयक प्रदीप सोनवणे, सह समन्वक समाधान जाधव, अमित चौधरी यांनी दिली. शहरी लाेक पाड्यावर एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात याचा आनंद असल्याची भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली.

_______________________________________________________

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!