नारीशक्ती ग्रुप जळगाव तर्फे दीपस्तंभ मनोबल येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत भाऊबीज साजरी..
भाऊ बहिणीची माया
प्रेमाने मायेने औक्षण
एकमेकांचा होऊ आधार
करु नात्यांचे रक्षण
जळगाव ( प्रतिनिधी ) –
दिवाळी सणा सोबत येणारा सण म्हणजे भाऊबीज हा सण होय प्रेमाचे नाते जपणारा हा सण असून सर्वदूर तो साजरा केला जातो पण अशावेळी समाजासाठी नेहमीच काम करणाऱ्या नारीशक्ती ग्रुप जळगाव ने भाऊबीज हा सण दीपस्तंभ फाऊंडेशन संचलित मनोबल संजीवन गुरुकुल येथील दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत सण साजरा केला. या प्रसंगी दिव्यांग विद्यार्थ्यांना करदोळा व श्रीफळ, टॉवेल देऊन तसेच ओवाळून खरी भाऊबीज साजरी केली. याप्रसंगी दीपस्तंभ फाऊंडेशनचे यजुर्वेंद्र महाजन, महापौर माननीय जयश्रीताई महाजन नारीशक्ती ग्रुपच्या अध्यक्ष मनिषा पाटील,सुमित्रा पाटील, नूतन तासखेडकर , भारती कुमावत , ॲड वैशाली बोरसे, माधुरी शिंपी ,माधुरी जावळे ,रेणुका हिंगु अश्विनी पाटील हे उपस्थित होते.