राजमार्ग प्रगतीचा वैज्ञानिक दृष्टिकोण..

लेखक:- राजेश वसंत रायमळे (एम.ए.एल.एल.बी.)

जयभीम चा जागर हा वैज्ञानिक दृष्टिकोणाचा आधार आहे १४ ऑक्टोबर १९५६ अशोका विजया दशमी दिनी परम् पुज्य बोधिसत्व बाबासाहेब डाॅ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह धर्मांतर करून तथागत गौतम बुद्ध यांचा विवेकवादी विज्ञाननिष्ठ धम्माचा स्वीकार करून खऱ्या अर्थाने भारत देशात वैज्ञानिक दृष्टिकोणाला चालना दिली. त्याही आधी बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वात मोठे ३९५ कलमांचे भारतीय संविधान भारत देशाला देवून संविधानाच्या कलमा कलमात वैज्ञानिक दृष्टिकोण रूजवलेला आहे.वैज्ञानिक दृष्टिकोण’ हां ‘माणूस म्हणून जगण्यासाठी खूप महत्वाचा आहे.भरताचे संविधान प्रत्येक भारतीय नागरिकाला ‘वैज्ञानिक दृष्टिकोणाचा’ प्रचार,प्रसार आणि अंगीकार करण्यास सांगते.म्हणजेच भारतीय संविधानाने वैज्ञानिक दृष्टिकोण महत्वपूर्ण मानला आहे.वैज्ञानिक दृष्टिकोण म्हणजे काय? तर “कुठल्याही घटनेमागील कार्यकारणभाव समजून घेणे किंवा दोन घटनांमधील परस्परसंबंध तपासून पाहणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोण होय.”जेवढा पुरावा उपलब्ध आहे,तेवढाच विश्वास ठेवणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोण होय.एखादी गोष्ट सत्यआहे कींवा नाही,यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोण निरीक्षण,तर्क,अनुमान,प्रचिती आणि प्रयोग या मार्गांनी ज्ञान आत्मसात करण्याची विज्ञानाची ही पद्धत आहे.वैज्ञानिक दृष्टिकोण शब्दप्रामाण्य मानत नाही. ग्रंथप्रामण्य मनत नाही.चमत्काराचा दावा सुध्दा मान्य करित नाही.आजवर झालेली माणसाची प्रगती केवळ ‘विज्ञानाच्या’ आधारे झालेली आहे. विज्ञान नेहमीच
नवनवीन बदलांना आत्मसात करत असते.धर्माप्रमाणे ते अंतिम सत्याचा दावा अजिबात करत नाही.मानवाचा आजवरचा इतिहास हा श्रद्धा तपासण्याचा इतिहास आहे’ विज्ञानाने आलेले बदल धर्माला काळाच्या ओघात स्वीकारावे लागले.आजवर धर्माने मानवी प्रगतीसाठी एकही नविन शोध लावलेला नाही.वैज्ञानिक दृष्टिकोण आत्मसात करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे “छद्म विज्ञान (pseudo science)” यापासून सावध असले पाहिजे.छद्म विज्ञानाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे “वास्तू शास्त्र, जोतिष शास्त्र.आज समाजात अनेक गोष्टी ‘यामागे विज्ञान आहे’ अस सांगून जनसमान्यांच्या माथी थोपवल्या जातात. त्या गोष्टीत नक्की विज्ञान आहे का, हे “वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे ठरवावे.
विज्ञानाला आज सगळ्या गोष्टींची कारणे माहित नाहीत,पण ती कारणे वैज्ञानिक दृष्टिकोणाच्या आधारेच समजू शकतात.आपल्या जीवनात आज जे जे काही घडतं,त्यामागे पूर्व संचित आहे,नियती आहे,नशीब आहे,पूर्वजन्मीच पाप आहे.अस समजने हा पळपुटेपनाचा मार्ग आहे.कष्टाला पर्याय नाही हे वैज्ञानिक दृष्टिकोण सांगतो.
आत्मा-परमात्मा,जन्म-मृत्यु,प्रारब्ध-संचित-नशीब-मोक्ष यांची मांडणी अनेक धर्मानी,अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे. व्यक्तिपरत्वे हा गोंधळ बदलू शकतो. वैज्ञानिक दृष्टिकोन हे सारा फसवेपना नाकरतो. जे विज्ञानाच्या कसोटिवर टीकते, ते ते खरं अस वैज्ञानिक दृष्टिकोण सांगतो.धर्माच्या शिवाय माणसाच्या विवेकातून नीती निर्माण होऊ शकते,असे वैज्ञानिक दृष्टिकोण सांगतो.इतरांनी आपणाशी जसे वर्तन केलेले आपनाशी आवडत नाही,तसे वर्तन आपन इतरांशी करू नये आणि इतरांनी आपणाशी जसे वर्तन केलेले आपल्याला आवडते,तसे वर्तन आपणदेखिल इतरांशी करावे.वैज्ञानिक दृष्टिकोण कधीच माझा शब्द अंतिम सत्य असा दावा करत नाही.तो नेहमीच नवनवीन सत्य पुराव्या आधारे स्वीकारत जातो.थोडक्यात असं की प्रत्येक कार्यामागे कोणते ना कोणते कारण असतेच ते कारण मानवी बुद्धीला समजू शकते.सर्वच गोष्टींची कारणे समजतात असेही नाही. वैज्ञानिक दृष्टिकोण ही विचार व कृती करण्याची पद्धती आहे,सत्यशोधनाचा मार्ग आहे, आणि त्यामुळेच जानिवांचे स्वातंत्र्य प्राप्त होते.एक प्रकारे परिपक्वता’ वैज्ञानिक दृष्टिकोन व्यक्तीमध्ये निर्माण करतो.भारतीय संविधानाला अभिप्रेत असणाऱ्या नागरीकत्वाचं भरण-पोषण प्रामुख्याने हां वैज्ञानिक दृष्टिकोण करतो.एकंदरीत असे म्हणता येईल की,विज्ञान हा ‘वैज्ञानिक दृष्टिकोण’ आपणाशी विवेकी मूल्यपरिवर्तनाचा कृतिशील संवाद साधू इच्छितो.ज्या समाजात योग्य काय आणि अयोग्य काय हे ओळखण्याची कुवत नसते त्या समाजाचा सत्यानाश झाल्या शिवाय राहत नाही! म्हणूनच बुध्दाने आपल्याला पंचशील दिले,पंचशीलाचे पालन म्हणजे आपल्यातील विवेकवादाला वाव देणे होय. तथागत गौतम बुद्ध,चक्रधर स्वामी, वर्धमान महावीर,महात्मा बसवेश्वर, संत रविदास,संत कबीर, संत तुकाराम, संत चोखोबा, गोरोबा, संत सावता महाराज, जिजाई, भिमाई, रमाई,सावित्रीमाई, अहील्यामाई होळकर,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिराव फुले,छत्रपती शाहूमहाराज, डॉ.बाबासाहब अम्बेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,पेरियार रामास्वामी नायकर,नारायणा गुरू , कर्पुरी ठाकूर, असे अनेक विवेक वादी महामाता आणि महामानव समाजात होऊन गेलेत ज्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोण आणि विवेकवादाचा पुरस्कार केला. आणि जगण्याचा प्रगतशील प्रज्ञा,शिल,करुणामय धम्म मार्ग आपल्याला दाखवून गेलेत.शेवटी एवढेच सांगतो कि,जो समाज विवेकवाद्यांना स्विकारतो तोच समाज प्रगती करू शकतो.पण खंत एवढीच वाटते की २१ व्या शतकात विज्ञान युगात जगत असून देखील आपण आजही या विवेकवाद्यांना स्विकारायला तयार नाही. उलट त्यांच्या विवेकवादी विचारांनाच तिलांजली देण्याचे निर्घृण कृत्य करित आहोत.
वैज्ञानिक दृष्टीकोन याचा एका शब्दामध्ये अर्थ- कार्यकारणभाव तपासणे, असा आहे. नंबर एक, प्रत्येक कार्याच्या मागे कारण असतं. नंबर दोन, ते कारण माझ्या बुद्धीला समजू शकतं. नंबर तीन, जगातल्या सगळ्याच कार्यांच्या मागची कारणं समजतात, असं नाही, पण ती ज्या वेळी समजतील, त्या वेळी ती कशी समजतील, हे कार्यकारणभावामुळे मला समजतं. आणि नंबर चार, यथार्थ ज्ञानप्राप्तीचा माणसाला लाभलेला हा सर्वांत खात्रीचा मार्ग आहे!———-डॉ.नरेंद्र दाभोलकर.
०१ नोव्हेंबर डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र कृतिशील अभिवादन.


लेखक:- राजेश वसंत रायमळे(एम.ए.एल.एल.बी.)

( राजेश वसंत रायमळे )

भ्रमण ध्वनी क्र.:- ९७६४७४२०७९

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!