ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयात शिक्षक पालक सभा संपन्न..
ऐनपुर प्रतिनिधी- (विजय एस अवसरमल )
ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयांमध्ये दि.०१/११/२०२१ रोजी शिक्षक पालक संघाची मिटिंग संपन्न झाली.
सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल शिक्षक व पालक संघाची मिटींग कला व विज्ञान महाविद्यालया आयोजित करण्यात आली होती या मिटींग मध्ये शिक्षक पालक संघाचे समन्वयक प्रा. एम.के. सोनवणे यांनी उपस्थित पालकांचे स्वागत आणि त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षक पालक संघ स्थापन करण्याची भूमिका विषद केली . या प्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे . बी.अंजने हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाचा विकास मांडला . यात महाविद्यालयात मिळणाऱ्या विविध सोयी, सुविधा, शिष्यवृत्त्या या बाबतीत माहिती दिली.राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास विभाग, मराठी वाड्मय मंडळ, वाद- विवाद मंडळ, विज्ञान मंडळ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला जातो. उपस्थित पालकांमधून श्री . सुरज कुमार गाढे यांनी पालक या नात्याने आपली भूमिका मांडली. यात पाल्यांच्या लसीकरणा बद्दल विषय चर्चेत आणला गेला. यावर लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष तासिकेला बसता येईल असे प्राचार्यांनी पालकांना सांगितले .
याप्रसंगी ८१ पालक व शिक्षक उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्राध्यापक महेंद्र सोनवणे यांनी केले.