वस्तीशाळा शिक्षकांच्या मागील सेवेसाठी लढा उभारणार अंबादास वाजे

प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्याध्यक्ष पदी अंबादास वाजे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करतांना शिक्षक बांधव

निफाड प्रतिनिधी-(रामभाऊ आवारे)

ग्रामीण भागातील वाडी वस्तीवरील मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी शासनाने 2001मध्ये गावा पासून दोन किलोमीटर अंतरावर वस्तीशाळा काढली याठिकाणी अल्प मानधन घेऊन अनेक तरुणांनी सेवा केली, शिक्षणात सरस ठरलेल्या शिक्षकांना शासनाने 2014 साली सेवेत घेतले पण त्यांनी अगोदर चौदा वर्ष ज्ञानदानाचे पवित्र काम केले त्याचा कोणताही लाभ सरकारने दिला नाही आयुष्यातील मोठा कालावधी गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले, त्या काळात केलेली सेवा ही ग्राह्य धरून त्यांची सेवापुस्तकात नोंद व्हावी, त्यांचा सेवेचा कालावधी सुरवातीपासूनचा धरण्यात यावा यासाठी प्राथमिक शिक्षक संघ लढा उभारेल आणि शासन दरबारी पाठपुरावा करेल असे आश्वासन प्राथमिक शिक्षक संघांचे नवनिर्वाचित राज्य अध्यक्ष अंबादास वाजे यांनी दिले. वस्तीशाळा शिक्षकांच्या वतीने वाजे यांचा सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी ते सिन्नर येथे बोलत होते.
राज्यात प्राथमिक शिक्षकांची सर्वात मोठी संघटना प्राथमिक शिक्षक संघ आहे या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष पदं 1914पासून पहिल्यांदाच मिळाले, जुनी संघटना असूनही नाशिक जिल्हा या पदापासून कायम दूर राहिला होता, मात्र वाजे यांच्या रूपाने हे पद मिळाले नाशिक जिल्ह्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, यांच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे त्याच पार्श्ववभूमीवर नाशिक जिल्यातील निफाड, मालेगाव, नाशिक, सिन्नर तालुक्यातील वस्तीशाळा शिक्षकानी वाजे यांचा सत्कार केला यावेळी आपण आपली संघटना आपल्या सोबत आहे, जुनी पेन्शन आणि वस्तीशाळा शिक्षकांची मागील सेवा या दोन्हीही मागण्या महत्वाच्या आहे यासाठी संघ लढा उभारेल असे आश्वासन वाजे यांनी दिले.
यावेळी व्यासपीठावर अरुण पाटील, विनायक ठोंबरे, पृथ्वीबाबा शिरसाठ, संदीप पाटील, संजय भोर, प्रदीप पेखळे, बाजीराव कमानकर, संदीप सूर्यवंशी, विलास पवार, रामदास चोभे, प्रदीप कुटे, भास्कर खेलूकर, संतोष गायकवाड तानाजी खालकर, संजय खालकर, सचिन ठोंबरे, अतुल कोकाटे, राजेंद्र कातकडे, राकेश पाटील, माणिक आव्हाड, सुजित गायधनी, यासह शिक्षक उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!