क्या बात है! राज्यातील शाळांचा चेहरामोहरा बदलणार? लागू होऊ शकतं दिल्ली स्कुल मॉडेल

नवी दिली,

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा सुरु करण्यात आल्या. बदलत्या काळानुसार शाळांना आता डिजिटल करण्याची आणि विद्यार्थ्यांना विशेष पद्धतीनं शिक्षण देण्याची गरज भासू लागली आहे. त्यामुळे शिक्षण पद्धतींमध्ये बदल करण्याची गरज आहे. दिल्ली सरकारनं यावर पावलं उचलत विद्यार्थ्यांना शाळांमध्ये योग्य त्या सुविधा पुरवल्या आहेत आणि अनेक विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातही तज्ज्ञ या कामगिरीवर समाधानी आहेत. त्यामुळे दिल्लीतील शाळांमध्ये असलेलं शिक्षणाचं मॉडेल हे राज्यातही लागू होण्याची शक्यता दिसतेय. आज मंत्री संजय बनसोडे यांनी दिल्लीतील दोन शाळांना भेट दिली आणि शिक्षणपद्धती समजून घेतली. त्यामुळे आता महाराष्ट्रातही दिल्ली स्कुल मॉडेल लागू होणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.
राष्ट्रीय राजधानीतील शिक्षणाचे मॉडेल समजून घेण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री संजय बनसोडे यांनी मंगळवारी दिल्लीतील दोन सरकारी शाळांना भेट दिली. अधिकार्‍यांनी सांगितले की, मंत्री यांनी कौटिल्य राजकिया सर्वोदय बाल विद्यालय, चिराग एन्क्लेव्ह, ग-ेटर कैलाश आणि स्कूल ऑॅफ एक्सलन्स, कालकाजीला भेट दिली.
राष्ट्रवादी काँग-ेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्री संजय बनसोडे यांना दिल्लीतील सरकारी शाळांना भेट देण्यास सांगितलं. दिल्लीच्या शैक्षणिक मॉडेलपासून भरपूर शिकण्यासारखं आहे आणि दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही सरकारी शाळा तयार व्हाव्या यासाठी शरद पवारांनी सांगितलं आहे, असं दिल्ली सरकारनं दिलेल्या निवेदनात म्हंटलं आहे.
शालेय दौर्‍यात मंत्री संजय बनसोडे हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासोबत होते. यावेळी मनीष सिसोदिया म्हणाले की, सार्वजनिक शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी दिल्ली सरकार महाराष्ट्र सरकारला मदत करण्यास तयार आहे. दिल्ली सरकारच्या अधिकार्?यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मंत्र्याला दिल्ली सरकारने सुरू केलेल्या देशभक्तीच्या अभ्यासक्रमाची देखील माहिती देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!