आवश्यक सेवेतील कर्मचार्यांनाही आता दोन्ही लस बंधनकारक
मुंबई
वैद्यकीय सेवा, दूरसंचार क्षेत्र, गॅस पुरवठा, जलपुरवठा शासकीय अधिकारी आदींना आता दोन्ही लस घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासंदर्भातील राज्य शासनाने परिपत्रक जारी केला आहे. अत्यावश्यक सेवे वर विपरित परिणाम होऊ नये, यासाठी लस बंधनकारक न करता पास दिला जात होता.
मासिक, त्रैमासिक पास मिळणार –
कोरोना लसींचे दोन डोस घेऊन 14 दिवसांचा कालावधी पूर्ण होत नाही, तोपर्यंत सर्वसामान्यांना लोकल प्रवासाला बंदी आहे. आवश्यक सेवेत काम करणार्यांना या नियम आतापर्यंत लागू नव्हता. वैद्यकीय कारणास्तव तसेच वृद्धापकाळामुळे लस न घेऊ शकणारे लोक सामील होते. मात्र आता लसीकरणाचा मुबलक साठा आणि वेग वाढल्याने लस अनिवार्य केली आहे. त्यामुळे आवश्यक सेवेतील तसेच शासकीय सेवेतील लोकांना सामील केले आहे. यापुढे प्रवासासाठी सार्वत्रिक (युनिव्हर्सल) पास अशाच व्यक्तींना दिला जाईल. त्याच बरोबर लोकल किंवा पॅसेंजर ट्रेनने प्रवास करणार्या लोकांसाठी मासिक त्रेमासिक सहा मासिक पास त्याचा प्रवाशांना देण्यात येईल, असे राज्य शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
मुंबई लोकल धावणार पूर्ण क्षमतेने –
गेल्या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले होते. या लॉकडाऊन काळात रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. नंतर 15 जून 2020 पासून, रेल्वेने राज्य सरकारने निवडलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या अत्यावश्यक सेवा श्रेणी कर्मचार्यांनासाठी उपनगरीय सेवा सुरू केली होती. आता गेल्या काही महिन्यांपासून कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आले आहे. यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. तर, नुकताच एका दिवसात 60 लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली. कोरोना पूर्वीच्या प्रवासी संख्येपेक्षा फक्त 25 टक्के प्रवासी संख्या कमी आहे. या सर्व प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी 95 टक्क्यांहून 100 टक्के फेर्या गुरुवारपासून चालविण्याचा निर्णय घेतला आहे.