‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची मुलाखत

मुंबई, दि. 27 :

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एअर’ या ॲपवर गुरुवार, दि. 28, शुक्रवार दि. 29 आणि शनिवार दि.30 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

भारत निवडणूक आयोग दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबवितो. हा कार्यक्रम नेमका काय, मतदाराने नाव नोंदणीचा अर्ज केल्यानंतर त्यावर निवडणूक कार्यालयाकडून साधारण काय प्रक्रिया केली जाते, हा पुनरिक्षण कार्यक्रम साधारण किती कालावधीचा असतो, दरवर्षी होणाऱ्या या मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाचे लोकशाही सक्षमीकरणात महत्त्व, तरुण मतदारांच्या जागृतीसाठी काय प्रयत्न केले जातात, 1 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या विशेष मोहिमेच्या निमित्ताने मतदारांना केलेले आवाहन आदी विषयांची माहिती श्री.देशपांडे यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!