फोनपेवर सर्व यूपीआय मनी ट्रॉसफर, ऑफलाईन आणि ऑनलाईन देणी नि:शुल्क
नवी दिल्ली,
भारतातील अग-णी डिजिटल देणी प्लेटफॉर्म फोनपेने मंगळवारी स्पष्ट केले की त्यांच्या पेमेंट अॅपवर सर्व यूपीआय मनी ट्राँसफर, ऑफलाईन आणि ऑनलाईन देणी (यूपीआय, व्हॉलेट, क्रेडिट आणि डेबिट कार्डवर) सर्व उपयोगकर्त्यासाठी मोफत आहे आणि हे सुरु राहतील.
कंपनीने म्हटले की मोबाईल रिचार्जसाठी फोनपेवर एक प्रयोग चालू असून जेथे उपयोगकर्ता एका लहान वर्गाकडून 51-100 रुपयांच्या रिचार्जसाठी 1 रुपये आणि 100 रुपयांपेक्षा अधिक रिचार्जसाठी 2 रुपये प्रोसेसिंग शुल्क घेतले जात आहे.
कंपनीने म्हटले की हे शुल्क सर्व देणी साधन (यूपीआय, व्हॉलेट, क्रेडिट आणि डेबिट कार्डवर) वर उपयोगकर्त्यांसाठी लागू आहे. ऐवढेच नाही तर 50 रुपयांपेक्षा कमीचे रिचार्ज पूर्णपणे मोफत आहेत. बिल भरणासाठी फोनपे क्रेडिट कार्डद्वारा भरणावर शुल्क घेत आहे आणि हे आता एक उद्योग मानंदड आहे.
कंपनीने नुकतेच प्रीपेड मोबाईल रिचार्जवर 50 रुपयां पर्यंत कॅशबॅकचे आश्वासन दिले होते. कंपनीने म्हटले की फोनपे अॅपच्या माध्यमातून रिचार्ज करणार्या उपयोगकर्त्याला 51 रुपयापेक्षा अधिकचे तीन प्रीपेड मोबाईल रिचार्ज पूर्ण केल्यानंतरच ही सुविधा मिळेल.
फोनपेचे 325 दशलक्षापेक्षा अधिकचे नोंदणीकृत उपयोगकर्ते असून या अॅप्सच्या माध्यमातून उपयोगकर्ते पैसे पाठविणे आणि प्राप्त करु शकतात. मोबाईल, डिटीएच, डेटा कार्ड रिचार्ज करु शकतात, स्टोरवर देणी करु शकतात, उपयोगकर्ता सोने खरेदी करु शकतात आणि या प्लेटफॉर्मच्या माध्यमातून गुंतवणुक करु शकतात.
फोनपेने 2017 मध्ये गोल्डला सुरु केले व वित्तीय सेवांमध्ये प्रवेश केला व हे उपयोगकर्त्यांना आपल्या प्लेटफॉर्मवर सुरक्षीतपणे 24 कॅरेट सोने खरेदीचा एक सुरक्षीत आणि सुविधाजनक पर्याय प्रदान करत आहे. प्लेटफॉर्मला पूर्ण भारतातून 22 दशलक्षापेक्षा अधिकृत मर्चंट आउटलेटसवर स्वीकार केले जात आहे.