शिक्षक संघाच्या राज्याध्यक्षपदी अंबादास वाजे —

वाजेंच्या रुपाने जिल्ह्याला पहिल्यांदाच बहुमान —

निफाड प्रतिनिधी–(रामभाऊ आवारे)

प्राथमिक शिक्षकांची सर्वात मोठी संघटना असलेली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ या संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी नाशिक जिल्ह्याचे शिक्षक नेते अंबादास वाजे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली
मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे दिनांक 24 रोजी शिक्षक संघाच्या राज्यस्तरीय महामंडळ सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते संभाजीराव थोरात हे होते.
अंबादास वाजे यांचे संघटनेतील अनेक वर्षांचे योगदान पाहून तसेच त्यांची संघटन कौशल्य बघून राज्यस्तरीय पदाधिकारी व संभाजीराव थोरात यांनी राज्य अध्यक्षपदी अंबादास वाजे यांच्या नावाची घोषणा केली. अंबादास वाजे यांच्या निवडीची घोषणा होताच नाशिक जिल्ह्यातील तसेच उत्तर महाराष्ट्रातील शिक्षक पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला व संघटनेच्या संपूर्ण इतिहासात प्रथमच उत्तर महाराष्ट्राला व नाशिक जिल्ह्याला राज्याध्यक्ष पद लाभल्याबद्दल सर्वांनी अंबादास वाजे यांचे हार्दिक अभिनंदन केले.
यावेळी शजिल्हा अध्यक्ष अर्जुन ताकाटे, सरचिटणीस धनराज वाणी, बाजीराव सोनवणे, विनायक ठोंबरे, प्रदीप पेखळे, विजय डेर्ले, निंबा बोरसे, प्रदीप पेखळे, रामदास शिंदे, सचिन वडजे, संतोष मेमाणे, संजय भोर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
या निवडीबद्दल जिल्हा अध्यक्ष अर्जुन ताकाटे, रामदास चोभे, सुरेश धारराव, बाजीराव कमानकर, प्रदीप कुटे, संतोष गायकवाड, भास्कर खेलूकर, राजेंद्र कापडणीस, आनंदा राजगुरू,पोपट घाडगे, समाधान पवार,दिपक माहेवार, रावसाहेब डावरे, विश्वास भवर,रोहीणी धारराव,संजय ठाकरे, शंकर सांगळे, विजय डेर्ले, संतोष मेमाणे, संतोष गांगुर्डे, रामकृष्ण भंडारे, भवर, विजय पाटील, राजेश सांगळे, प्रकाश शिरसाठ, प्रमोद क्षीरसागर, अमोल झोले, निंबा बोरसे, शरद बरमे, पृथ्वीबाबा शिरसाठ, ज्ञानेश्वर सालपुरे, मुकेश माळी, राजेंद्र आहिरे, संदीप पवार माणिक मुरकुटे, संतोष कदम, दत्ता कांदळकर, दिपक शेवाळे, सोमनाथ मापारी, धर्मेंद्र सोनवणे यांसह निफाड तालुका प्राथमिक शिक्षक संघाने अभिनंदन केले

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!