पेट्रोल 23.88 रुपये, तर डिझेल 22.21 रुपयांनी महागलं, 20 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं
नवी दिल्ली,
आज 24 ऑॅक्टोबर 2021 रविवारी पुन्हा पेट्रोल-डिझेल महागलं. केवळ ऑॅक्टोबर महिन्यात तब्बल 18 वेळा इंधन दरवाढ झाली आहे. 30 ते 35 पैसे अशी दररोज वाढ झाली आहे. कोरोनाचा फटका बसला असताना सिलेंडर वाढीसह इतरही अनेक गोष्टींच्या किंमती वाढल्या आहेत. त्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीने सर्वसामान्य चांगलाच मेटाकुटीला आला आहे. ऑॅक्टोबरमध्ये होत असलेली ही वाढ अतिशय विक्रमी असून याआधी इतक्या किंमती कधीच वाढल्या नव्हत्या.
यावर्षाच्या सुरुवातीला जानेवारी ते ऑॅक्टोबर या दहा महिन्यात पेट्रोल 23.88 रुपये, तर डिझेल 22.21 रुपयांनी महागलं आहे. मागील वीस वर्षांच्या आकडेवारीनुसार, एका वर्षात पेट्रोल दरात इतकी वाढ कधीही झालेली नाही.
देशाची राजधानी दिल्लीत 1 जानेवारीला पेट्रोल 83.71 रुपये होतं. ते आज ऑॅक्टोबर महिन्यात 107.24 रुपये झालं आहे.
देशातील जवळपास सर्वच राज्यात पेट्रोल 100 रुपयांवर गेलं आहे. केवळ हिमाचलमध्ये पेट्रोल 100 रुपयांहून कमी आहे. तर सर्वाधिक राजस्थानातील श्रीगंगानगरात 119 रुपये झालं आहे.
दरम्यान, वस्तू आणि सेवा कर अर्थात उएऊ काउंसिलच्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यांनी याबाबत बोलताना सांगितलं, की ’पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार करण्याची ही योग्य वेळ नाही. महसुलाशी निगडित अनेक मुद्द्यांचा यासाठी विचार करावा लागेल.’ आंतरराष्ट्रीय बाजारात येत्या 3-4 महिन्यांत कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर प्रतिबॅरलवर जाऊ शकतात. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांवर करकपातीचा दबाव असेल. करकपात केली नाही, तर पेट्रोलच्या दरांत 10 रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढ होऊ शकते, अशी माहिती आहे.