नववर्षाच्या सुरुवातीलाच सफरचंद खाणार भाव !

जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे बागांचे अतोनात नुकसान..

निफाड प्रतिनिधी-(रामभाऊ आवारे)

निसर्गाच्या वक्रदृष्टीने दरवर्षी शेतकऱ्यांचे द्राक्ष ,डाळिंब, मका, सोयाबीन, पालेभाज्या आदींचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत असते त्यातच यावर्षी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या प्रचंड बर्फवृष्टीमुळे सफरचंद बागांचे अतोनात नुकसान झाले असल्याने सफरचंदाची आवक कमीच राहणार असल्याने निश्चितच सफरचंदाच्या भावात वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निर्यातक्षम द्राक्ष उलाढालीत अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्याने सफरचंद उलाढालीत देखील आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे. सफरचंद खरेदी विक्रीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीर भागात गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड अतिवृष्टीसह बर्फवृष्टी सुरू असल्याने सफरचंद बागांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिबर्फवृष्टीच्या फटाक्यामुळे येत्या काही महिन्यात मागणीचा तुलनेत सफरचंदचा पुरवठा कमी होणार असल्याने डिसेंबर जानेवारी महिन्यात सफरचंदाच्या दरात तेजी राहणार असल्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून वर्तीविण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यात महिन्याकाठी १०० कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या सफरचंदाची जिल्हातील व्यापारी वर्गाकडून थेट जम्मू काश्मीर, शिमला भागात जाऊन खरेदी केली जात आहे. यंदा शिमला येथील हंगाम पूर्णपणे आटोपला आहे.तर जम्मू काश्मीर येथील हंगाम सुरु असून नाशिकच्या २५ते ३० निर्यातदार व्यापारी वर्गाकडून काश्मीरच्या साधा डिलक्स, व कुल्लू डिलक्स या उच्चप्रतिचा मालाला सर्वाधिक पसंती लाभत असली तरी गेल्या दोन दिवसांपासून जम्मू काश्मीर भागात प्रचंड अतिवृष्टीसह बर्फवृष्टी सुरू असल्याने सफरचंद बागा पूर्णपणे भुईसपाट होत स्थानिक उत्पादकांच्या मालाचे पूर्णपणे नुकसान झाल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात घट होणार असल्याने येत्या डिसेंबर जानेवारी महिन्यात सफरचंद किलो मागे ६० ते ८० रुपयांनी तर २०किलो मागे ३००ते ४०० रुपयांनी वधारण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून वर्तविण्यात येत आहे.

असे असणार दर
किरकोळ विक्री
सध्याचे दर(kg) पुढील दर
८० ते १०० १२० ते १५०

२०किलोचे दर
प्रकार सध्याचे दर पुढील दर
साधा डिलिशन ८०० ते १०००. १२०० ते १४००
कुल्लू डिलिशन १००० ते १२०० १४००ते १६००

जम्मू काश्मीर मध्ये गेल्या दोन दिवसांपासून अतिवृष्टीसह बर्फवृष्टी सुरू असल्याने सफरचंद बागा पूर्णपणे भुईसपाट झाल्याने दोन महिन्यांत सदरचंदच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी राहणार असल्याने भाव तेजीत राहण्याची शक्यता आहे.
संपत कडाळे – फळविक्रेता वनसगाव.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!