कानपूरमध्ये झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला! तपासासाठी दिल्लीहून पथक रवाना
नवी दिल्ली,
उत्तर प्रदेशात झिका व्हायरस दाखल झाला आहे. वास्तविक, झिका विषाणूचा राज्यातील पहिला रुग्ण कानपूरमध्ये सापडला आहे. झिका विषाणूचे रुग्ण आढळल्यानंतर दिल्लीतील तज्ज्ञांचे पथक कानपूरला पोहोचले आणि रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचे नमुने घेण्यात आले. त्यानंतर सर्व लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, रुग्ण हवाई दल स्टेशनचा कर्मचारी आहे.
या रुग्णांना सध्या एयरफोर्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लक्षणांच्या आधारे हॉस्पिटल व्यवस्थापनाने त्यांचे नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठवले आहे. झिका विषाणूने ग-स्त हवाई दलाचे वॉरंट अधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून तापाने त्रस्त होते. व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी दहा टीम तयार करण्यात आल्या आहेत.
कानपूरमध्ये झिका विषाणूच्या रुग्णाची खात्री होताच या विषाणूच्या प्रतिबंधासाठी आणि पुढील तपासणीसाठी 10 पथके कानपूरला पाठवण्यात आली आहेत. ही टीम व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आणि व्हायरस कसा पसरला हे शोधण्यासाठी काम करेल. उत्तर प्रदेशात हवाई दलाचे वॉरंट अधिकारी एम एम अली चार-पाच दिवसांपासून तापाने त्रस्त होते. त्याची तपासणी केल्यानंतर नमुना पुण्यात पाठवण्यात आला तेव्हा त्यांना झिका विषाणू असल्याची पुष्टी झाली. झिका व्हायरसने त्रस्त असलेला एमएम अली हा पोरखपुरचा रहिवासी आहे.
जिल्हा दंडाधिकारी विशाख यांनी हवाई दल रुग्णालयासह अनेक वैद्यकीय महाविद्यालयांच्या आरोग्य तज्ज्ञांची बैठक बोलावली. याशिवाय जिल्हाधिकार्यांनी महापालिकेला फॉगिंग आणि डास प्रतिबंधक फवारणी करण्यास सांगितले आहे. राज्यातील हे पहिलेच प्रकरण असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. हे टाळण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत.
देशात जीवघेण्यात कोरोना व्हायरस (ण्दन्ग्-19) च्या नव्या रुग्णांमध्ये आज मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 15 हजार 906 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर काल (शनिवारी) 561 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा 4 लाख 54 हजार 269 वर पोहोचला आहे.