कर्नाटक : लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी वकिल, दोन पोलिस निलंबीत
दक्षिण कन्नड
मेंगलूरुमध्ये एक वरिष्ठ वकिलांच्या विरोधात कायद्याची विद्यार्थीनीद्वारा दाखल लैंगिक शोषणाच्या प्रकरणात कर्तव्यामध्ये निष्काळजीपणा केल्याच्या आरोपामध्ये एक महिला उपनिरीक्षकासह दोन पोलिस अधिकार्यांना निलंबीत करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्राने शनिवारी दिली.
अन्य एका घटनाक्रमामध्ये आरोपी वकिल के.एस.एन.राजेश भटला पुढील आदेशा पर्यंत कर्नाटक राज्य बार काउंसिलच्या सदस्यतावरुन निलंबीत करण्यात आले आणि न्यायालयात प्रॅक्टिस न करण्याचे निर्देशही दिले गेले आहेत.
या दरम्यान भ-ष्टाचार निरोधक विभाग (एसीबी) च्या अधिकार्यांनी त्यांना तिसरे अतिरीक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात एसीबीच्या विशेष लोक अभियोजक (एसपीपी) च्या रुपात काम सुरु न ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
मेंगलूर कॉलेजची कायदा पदवीची विद्यार्थीनीने आरोपीच्या विरुध्द लैंगिक शोषणाचा गुन्हा नोंदविला होता. पीडिताच्या मित्राने ही वकिलाच्या विरोधात धमकी देण्याचा आरोप लावत एक अन्य तक्रार दाखल केली होती. पीडिता आणि वकिलामधील बोलण्याचा ऑडियो क्लिप प्रसारीत झाला आहे.
उपनिरीक्षक श्रीकला आणि हेड कॉन्स्टेंबल प्रमोद निलंबीत पोलिस अधिकारी आहेत. त्यांच्या विरोधात कारवाई सुरु करण्यात आली आहे कारण त्यांनी पीडिताचे अंगठयाचे निशान आणि कायद्याच्या विरोधात तिचे निवेदन नोंदविले होते.
पीडिताच्या मित्राद्वारा नोंदविण्यात आलेल्या धमकीच्या प्रकरणात पोलिसांनी तीन लोकांना अटक केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये आरोप केला होता की आरोपीच्या मित्रांनी या प्रकरणात कायद्याचा सल्ला देण्याच्या बहाण्याने त्याच्याशी संपर्क केला आणि त्याला धमकी दिली.
मेंगलूरचे कमिशन एन.शशि कुमार यांनी याला गंभीर प्रकरणात असल्याचे सांगत म्हटले की या प्रकरणाच्या संवेदनशीलतेला पाहता प्रकरणात पारदर्शिता सुनिश्चित करण्यासाठी त्यानी आयपीएल अधिकारी रंजीत बंडारुना तपासाचे प्रभारी म्हणून नियुक्त केले होते आणि याचा तपास सुरु आहे.