ग्रॅव्हिटी सेप्रेरेटर यंत्र वापरण्याचे फायदे…..

थोरगव्हाण (प्रतिनिधी) –

थोरगव्हाण येथे धान्य सफाई, प्रतवारी साठी ग्रॅव्हिटी सेप्रेटर यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. या यंत्राने उफणनी किंवा चाळणीची कामे सुकर झालेली आहे .मजुरांचा तुटवडा यामुळे ग्रॅव्हीटी सेप्रेटर यंत्राची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. परतीच्या पावसानंतर शेतकरी राजा हाती आलेल्या कडधान्य चांगल्या प्रकारे स्वच्छता, वाळवण, प्रतवारी, साठवणूक यासाठी प्रयत्नशील आहे. अनेक शेतकरी बांधवांनी निर्मल सीड्स यांच्यामार्फत बियाणे खरेदी केले होते .उत्पादित झालेला माल तेच खरेदी करतील या तत्वावर बियाणे पुरविण्यात आले होते त्या उत्पादित कडधान्य मालाची चांगली प्रतवारी असावी यासाठी थोरगव्हाण गावात निर्मल सीड्स कंपनीमार्फत ग्रॅव्हिटी सेप्रेरेटर यंत्र पुरवण्यात आले आहे .यंत्र शेतातील माल काढणीपश्‍चात या यंत्राचे महत्व ग्रामीण भागात वाढले आहे या ग्रॅव्हिटी सेप्रेरेटर यंत्राचे शेतकऱ्यांनी अनेक फायदे सांगितले आहेत श्री सुधाकर चौधरी यांनी सांगितले की कडधान्य ,तृणधान्य आणि तेलबिया या उत्पादनाच्या प्रतवारी साठी मशीन उपयुक्त आहे . थोरगव्हाण गावचे माजी सरपंच श्री सतीश भाऊ चौधरी यांनी यंत्र वापर केल्यानंतर पुढील अनुभव सांगितले हे यंत्र वजनाने हलके असल्यामुळे कुठेही नेता येते, विज खर्चात बचत होते त्यामुळे या यंत्राचा वापर शेतकरी बांधव मोठया प्रमाणात करू लागले आहेत. प्रगतिशील शेतकरी उमाकांत बाऊस्कर यांनी सांगितले की धान्य सफाई ,प्रतवारी मुळे कडधान्याला बाजार भाव चांगला मिळतो .श्री दिनकर पाटील यांनी सांगितले की ग्राहकाला चांगल्या गुणवत्तेचा आणि दर्जेदार माल दिल्यास तो चार जास्तीचे पैसे देण्यासाठी तयार असतो त्यासाठी धान्याची प्रतवारी लावून घेणे क्रमप्राप्त आहे . प्रगतिशील शेतकरी श्री पंकज चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की धान्याच्या प्रतवारी मुळे मालाचे मूल्य वाढते म्हणून आपल्या मालाची चांगली प्रत ठेवणे या यंत्रामुळे सोपे जाते. शेतकरी व्यापारी श्री संतोष पाटील यांनी सांगितले की या यंत्रामुळे धूळ, काडीकचरा, खडे, माती वेगवेगळी केली जाते व हे मशीन वापरण्यात सोपे आहे त्यामुळे शेतकरी या यंत्राचा वापर करताना दिसत आहे. शेतीत यांत्रिकीकरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच या योजनांचा फायदा होताना दिसून येत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!