भारत-इंग्लंड कसोटी मालिकेबाबत निर्णय, रद्द झालेली 5 वी कसोटी कधी होणार ?

मुंबई ,

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात ऑॅगस्ट-सप्टेंबर 2021 मध्ये 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेचं आयोजन करण्यात आलं होतं. या मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्याबाबत मोठी अपडेट आली आहे. तब्बल 42 दिवस बीसीसीआय आणि ईसीबी या दोन्ही क्रिकेट बोर्डांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर रद्द करण्यात आलेल्या पाचव्या कसोटीबद्दल मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनामुळे रद्द करण्यात आलेल्या या पाचव्या सामन्याचं आयोजन हे पुढील वर्षी जुलै 2022 मध्ये करण्यात येणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती टिवटद्वारे दिली आहे.

कोरोनामुळे रद्द करण्यात आलेला ही पाचवी टेस्ट मॅच एजबेस्टमध्ये खेळवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या सामन्यानंतर या मालिकेचा निकाल लागणार आहे. पहिल्या 4 सामन्यांपैकी 2 सामने टीम इंडिया तर 1 मॅच टीम इंडियाने जिंकली आहे. त्यामुळे या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. ही मालिका आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग असणार आहे.

टीम इंडिया पुढील वर्षी 2022 मध्ये इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहे. या दौर्‍यात टीम इंडिया वनडे आणि टी 20 मालिका खळणार आहे. या दौर्‍याची सुरुवात ही या उर्वरित 5 व्या कसोटीने होणार आहे. हा सामना 1 ते 5 जुलैदरम्यान खेळवला जाणार आहे.

2 तासांआधी सामना रद्द

या पाचव्या कसोटीचं आयोजन हे वेळापत्रकानुसार 10 ते 15 सप्टेंबरला करण्यात आलं होतं. मात्र या सामन्याआधी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि इतर सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे सामन्याच्या अवघ्या 2 तासांआधी सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!